या चार दिवसात गेली चार वर्षे विसरलो…. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानची पहिली प्रतिक्रिया

Shah Rukh Khan : ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शाहरुख म्हणाला,”जगभरातील सिने-प्रेक्षक ‘पठाण’ सिनेमाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी ‘पठाण’ला शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाकाळात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. या सिनेमाचा भाग असलेल्या प्रत्येकाने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सिनेमाचं यश हे सर्वांचं आहे. ‘पठाण’ सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल शाहरुखने दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंदचेदेखील आभार मानले. 

शाहरुखसाठी ‘ते’ चार वर्ष कसे होते? 

शाहरुख खानने ‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. ‘पठाण’आधी त्याचा ‘झिरो’ (Zero) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. आता ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर गेल्या चार वर्षांबद्दल भाष्य करताना शाहरुख म्हणाला,”माझ्या आयुष्यातील ‘या’ चार वर्षांत काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या. या चार वर्षांत मी मुलांसोबत वेळ घालवला, त्यांना मोठं होताना पाहिलं”. 

चार वर्षात काय केलं यावर बोलताना शाहरुख पुढे म्हणाला,”माझा ‘पठाण’ आधीचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यामुळे प्लॅन बीच्या दृष्टीने विचार करत मी जेवण बनवायला शिकलो. मी इटालियन जेवण बनवायला शिकलो. लोक म्हणाले की, आता माझे सिनेमे चालणार नाहीत, म्हणून मी रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला. लोकांना आनंद वाटण्याचा प्रयत्न केला. आता ‘पठाण’ सिनेमाच्या यशामुळे मी मागचे चार वर्ष विसरलो आहे”. 

हेही वाचा :  Tunisha Sharma : वयाच्या 20 व्या वर्षात कोट्यवधींची मालकीण तुनिषा शर्मा

शाहरुख पुढे म्हणाला,”मी लोकांपर्यंत आनंद पसरवू शकेन ही मनापासून इच्छा आहे आणि या सिनेमाच्या माध्यमातून मला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आदित्य आणि सिद्धार्थ आनंद यांचा मी कायम ऋणी राहीन ज्यांनी मला काम करण्याची संधी दिली. मी जॉन, दीपिका, आदित्य, सर्वांचे आभार मानतो. ‘पठाण’ हा सिनेमा एवढा मोठा सुपरहिट ठरला आहे यावर आम्हाला अजूनही विश्वास बसलेला नाही”.

संबंधित बातम्या

Pathaan Box Office Collection : तो आला अन् त्यानं जिंकलं! ओपनिंग वीकेंडला शाहरुखच्या ‘पठाण’ने केली 542 कोटींची कमाई

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …