जाणून घ्या शाहरुखच्या ‘पठाण’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूडसाठी 2022 हे वर्ष खास ठरलं नसून आता 2023 वर्षाची सुरुवात मात्र खूपच दमदार झाली आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. किंग खानचं कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. रिलीजच्या पहिल्याच वीकेंडला शाहरुखच्या ‘पठाण’ने रेकॉर्डब्रेक कमाई करत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. 

ओपनिंग वीकेंडला ‘पठाण’चा जलवा!

‘पठाण’ हा सिनेमा 25 जानेवारी 2033 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात शाहरुखचं आणि त्याच्या सिनेमाचं कौतुक होत आहे. ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. दिवसेंदिवस ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. 


शाहरुखच्या ‘पठाण’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी अर्थात पहिल्या वीकेंडला 58.50 कोटींची कमाई केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतच्या सिनेमांपैकी पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ‘पठाण’ ठरला आहे. एकंदरीतच बॉक्स ऑफिसवर सध्या ‘पठाण’चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा :  RRR : सिनेप्रेमींसाठी खुशखबर, एसएस राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 3D मध्ये रिलीज होणार!

500 कोटींच्या क्लबमध्ये ‘पठाण’ची एन्ट्री!

‘पठाण’ हा सिनेमा आता 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 542 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानचा चाहतावर्ग जगभरात आहे. जगभरातील शाहरुखचे चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत. जगभरातील अनेक सिनेमागृहात या सिनेमाने हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवला आहे. 

भारतात ‘पठाण’चा बोलबाला 

भारतीय सिनेप्रेक्षकांची पाऊले पुन्हा एकदा सिनेमागृहाकडे वळवण्याचे काम शाहरुखच्या ‘पठाण’ सिनेमाने केलं आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘पठाण’ने 55 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी, चौथ्या दिवशी 51.50 कोटी आणि पाचव्या दिवशी 58.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या पाच दिवसांत भारतात या सिनेमाने 271 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा पाहायला सिनेप्रेक्षक पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जात आहेत. टाळ्या, शिट्ट्या आणि आक्रोश करत ते शाहरुखच्या ‘पठाण’चा आनंद घेत आहेत. आपल्या लाडक्या सेलिब्रिटीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहताना चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

संबंधित बातम्या

Pathaan Box office Collection: बॉक्स ऑफिसवर पठाणचा जलवा; जाणून घ्या पाचव्या दिवसाचं कलेक्शन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …