Maharashtra Tableau: महाराष्ट्राने पटकावला दुसरा क्रमांक; UP चा चित्ररथ तिसऱ्या स्थानी तर पहिलं स्थान…

Maharashtra Tableau Republic Day 2023 Win 2nd price: प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावरील (राजपथावर) परेडमध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथाला (Maharashtra Tableau Republic Day 2023) दुसऱ्या क्रमांकांचं बक्षीस मिळालं आहे. सर्वोत्तकृष्ट चित्ररथांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या स्थानी राहिला आहे. तर पहिला क्रमांक यंदा उत्तराखंडच्या (Uttarakhand Tableau Frist Price) चित्ररथाने पटकावला. एकूण 17 राज्यांच्या चित्ररथांचा ही निवड करताना विचार करण्यात आला. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला.

महाराष्ट्राच्या चित्ररथाची थीम काय होती?

‘साडेतीन शक्तीपिठे आणि स्त्रीशक्तीचा जागर’ या थिमवर महाराष्ट्राचा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथावर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीच्या देवींचे मुखवटे दाखवण्यात आल्या होत्या. या चित्ररथाबरोबर गोंधळीही नाचक होते. गोंधळ्यांचं प्रमुख वाद्य असलेलं संबळ वाजवणारा गोंधळी चित्ररथाच्या दर्शनी भागी होता. ही साडेतीन शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान आहे असं या चित्ररथामधून अधोरेखित करण्यात आलं होतं.

महाराष्ट्रामधील साडेतीन शक्तीपिठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरमधील तुळजाभवानीचे मंदिर, माहूरची रेणुकादेवी आणि नाशिकमधील वणी येथील सप्तशृंगी देवाचा समावेश होतो. या सर्व देवींचे भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमा साकारण्यात आल्या होत्या. 

हेही वाचा :  Weight Loss: चिकन की पनीर, वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम काय चांगले, जाणून घ्या

 

उत्तराखंडच्या चित्ररथाची थीम काय होती?

पहिला क्रमांक पटकावलेल्या उत्तराखंडच्या चित्ररथाची थीम जीम कॉर्बेट नॅशनला पार्क ही होती. या चित्ररथाच्या पुढील भागी दोन सुंदर हरणं दाखवण्यात आली होती. तिसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशचा चित्ररथ हा अयोध्येमधील दिपोत्सव सेलिब्रेशनसंदर्भातील होता.

हे चित्ररथ झालेले सहभागी

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड क्षेत्रीय आधारावर केली जाते. राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे उत्तर विभाग, मध्य विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर पूर्व विभाग अशा सहा विभागांमध्ये वर्गीकरण करण्यात आले असून दरवर्षी याच आधारे चित्ररथांची निवड केली जाते. सामान्यपणे 15 ते 18 चित्ररथांची निवड दरवर्षी केली जाते. यंदा महाराष्ट्राबरोबरच आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली, दीव आणि दमण, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या 17 राज्यांनी चित्ररथ कर्तव्यपथावरील परेडमध्ये सहभागी झाले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून प्रत्येक राज्याने आपल्या भौगोलिक आणि संस्कृतिक विविधतेचं दर्शन राष्ट्रीय स्तरावर घडवलं.

हेही वाचा :  Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या

या 17 राज्यांबरोबरच संस्कृती मंत्रालय, गृह मंत्रालय (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल), गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग), आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (इंडियन कौन्सिल अॅग्रीकल्चर रिसर्च अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद), गृह मंत्रालय (अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो) या मंत्रालयांचे आणि विभागांचे सहा चित्ररथही या परेडमध्ये सहभागी झाले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘या’ मार्गांसाठी ‘समर स्पेशल’ ट्रेनची सोय

Indian Railway : एकिकडे कोकण रेल्वेनं (Konkan Railway) पावसाळी वेळापत्रक जारी केलं नसल्यामुळं मध्य रेल्वेच्या …

‘माझा गत जन्म बंगालमध्ये झाला होता…’ पंतप्रधान मोदी असं का म्हणाले?

Loksabha 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान (Second Phase Voting) पार पडतंय. देशभरातील …