Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या

Pandharpur Wari 2023 Special Train News In Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. विठ्ठल भेटीची आस घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष 76 रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा आषाढी एकादशी 29 जून रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला जात असतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून 23 जून ते 3 जुलै या कालावधीत रेल्वेच्या 76 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष रेल्वेचे वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध केले असून तुम्हीही हे वेळापत्रक जाणून घेऊ शकता.

पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या नागपूरहून मिरज, नागपूर-पंढरपूर यासह नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो भाविकांची सोय होणार आहे. 

नागपूर – पंढरपूर स्पेशल : ही ट्रेन क्रमांक 01207 नागपूरहून 26 जून आणि 29 जून 2023 रोजी सकाळी 8.50 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी पंढरपुरला पोहोचेल.  तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून 1208 विशेष क्रमांकाची गाडी 27 आणि 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. 

हेही वाचा :  फुफ्फुसे आतून पोखरून निकामी करतात या 3 गोष्टी, कॅन्सरपासून बचावासाठी लगेच करा हे 5 उपाय

या गाडीला एक सेकंड वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 स्लीपर क्लास आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे. 
 या स्थानकांवर थांबणार- अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबते.

नवीन अमरावती – पंढरपूर स्पेशल : नवीन अमरावती येथून गाडी क्रमांक 01119 विशेष 25 आणि 28 जून रोजी दुपारी 2:40 वाजता पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:10 वाजता पंढरपुरला पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून गाडी क्रमांक 01120 विशेष गाडी 26 व 29 जून रोजी रात्री 7.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 12.40 वाजता नवीन अमरावती स्थानकात पोहोचेल.

या स्थानकात थांबणार – बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी स्थानकवार थांबेल. या ट्रेनला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 स्लीपर कोच, सात सामान्य द्वितीय श्रेणी किंवा दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

हेही वाचा :  मावळच्या सोन्या- खासदार, सोन्या- राजाला मिळाला तुकोबांचा पालखी रथ ओढण्याचा मान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …