फुफ्फुसे आतून पोखरून निकामी करतात या 3 गोष्टी, कॅन्सरपासून बचावासाठी लगेच करा हे 5 उपाय

Lung Cancer हा एक असा आजार आहे ज्यामध्ये फुफ्फुसांच्या टिश्यूंमध्ये धोकादायक पेशी तयार होतात. स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत. फुफ्फुसाचा कर्करोग हे जगभरातील पुरुष आणि महिला दोघांमध्ये कॅन्सरच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की फुफ्फुसाच्या कॅन्सरची कारणे काय आहेत?

तर मंडळी, कर्करोग होण्याच्या सर्वात सामान्य कारणांमध्ये तंबाखू, धूम्रपान, वायू प्रदूषण, रेडिएशनच्या संपर्कात येणं, कोळसा आणि बेरिलियमसारख्या रसायनांचा संपर्क आणि कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास यांचा समावेश होतो. हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट क्लिनिकल आणि इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजिस्ट, डॉ. व्ही प्रतिभा प्रसाद यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कोणत्या उपायांद्वारे कमी केला जाऊ शकतो हे सांगितले आहे. (फोटो सौजन्य :- iStock)

तंबाखूपासून दूर राहा

तंबाखूपासून दूर राहा

तंबाखूचे सेवन हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची जेवढी प्रकरणे आहेत त्यापैकी 90% प्रकरणांमागे तंबाखू सेवेन हे कारण आहे. सिगारेट, सिगार, पाईप, हुक्का, इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि तंबाखू सेवन फुफ्फुसासाठी धोकादायक आहे. धूम्रपान न करणार्‍यांपेक्षा धूम्रपान करणार्‍यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका सुमारे 20 पट जास्त असतो. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे धूम्रपान ताबडतोब बंद करणे.
(वाचा :- Mental Health : धावपळ केल्यानंतरही 100 स्पीडने धावेल शरीर, हे 5 उपाय केल्यास रोबोटसारखं काम करूनही थकणारच नाही)​

हेही वाचा :  राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

सेकंड हँड स्मोक एक्सपोजरपासून दूर राहा

सेकंड हँड स्मोक एक्सपोजरपासून दूर राहा

सेकंड हँड स्मोक म्हणजे तुम्ही धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे होय. यामुळे धुम्रपान न करता सुद्धा तुमच्या फुफ्फुसात विषारी वायू जातात आणि म्हणूनच हा प्रकार अधिक हानिकारक आहे. यामुळे तुमच्या फुफ्फुसाच्या पेशींना हानी पोहोचते आणि कर्करोगाचा धोका वाढतो. यासाठी धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर रहा आणि स्वत:ची काळजी घ्या.
(वाचा :- Vajrayana Yoga झटक्यात पोट साफ होत गॅस-अ‍ॅसिडिटी होईल मुळापासून नष्ट, या पोझमध्ये बसून जेवलं तर लगेच पचतं जेवण)​

रेडिएशन आणि केमिकलपासून दूर राहा

रेडिएशन आणि केमिकलपासून दूर राहा

रेडिएशन एक्सपोजर, विशेषतः रेडॉन, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगामागील एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा रेडिएशन आणि केमिकलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच एस्बेस्टोस, कोळसा, सिलिका, बेरिलियम, आर्सेनिक, निकेल इत्यादी हानिकारक रसायनांचा दीर्घकाळ संपर्क देखील टाळा. कारण जाणकारांच्या मते ही सर्व हानिकारक रसायने सुद्धा फुफ्फुसांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात.
(वाचा :- Weight Loss: पुणेकर महिलेने या सोप्या घरगुती ट्रिकने काही दिवसांत घटवले तब्बल 15 किलो वजन, हसणा-यांची बोलती बंद)​

हेल्दी डाएट आणि व्यायाम

हेल्दी डाएट आणि व्यायाम

आपल्या आहारात विविध फळे आणि भाज्या आणि धान्य यांचा आवर्जुन समावेश करा. कारण असा आहार हा जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. मोठ्या प्रमाणात पूरक आहार घेणे टाळा, कारण असे करणे हानिकारक असू शकते. याशिवाय, दररोज व्यायाम केल्याने फुफ्फुसे आणि इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
(वाचा :- Strawberry : या छोटाशा फळात आढळणारं व्हिटॅमिन आहे युरिक अ‍ॅसिडचं दुश्मन, क्षणभरात हे 12 भयंकर आजार करतं छुमंतर)​

हेही वाचा :  घरात 'या' ठिकाणी 'असे सेट करा Wi-Fi, इंटरनेट स्पीड कमी होणारच नाही, पाहा या ट्रिक्स

फुफ्फुसांची तपासणी

फुफ्फुसांची तपासणी

फुफ्फुसांची नियमित तपासणी केल्याने तुम्हाला योग्य आणि यशस्वी उपचार मिळू शकतात. तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा विशिष्ट वयोगटातील असाल, तर तुम्हाला फुफ्फुसाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही 50 ते 80 वर्षे वयाचे असल्यास आणि 20 वर्षांपासून दिवसातून किमान 1 पॅक इतके जरी धूम्रपान केले असल्यास किंवा तुम्ही अजूनही धूम्रपान करत असल्यास किंवा गेल्या 15 वर्षांत धूम्रपान सोडले असल्यास चाचणी करून घ्या. ही चाचणी तुमच्याच आरोग्यासाठी असून त्यातून तुमचे हृदय किती फिट आहे ते दिसून येऊ शकते.
(वाचा :- Vitamin D Food हाडाचा सुकलेला सांगाडा बनवते तुमची ही 1 चुक, आयुष्यभर जागेवर खिळण्याआधी खायला घ्या हे 10 पदार्थ)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मोदींच्या मनमानीविरुद्ध..’, ‘सत्तेतले नक्षलवादी’ म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका

Urban Naxal Issue: शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कठोर शब्दांमध्ये टीकास्र सोडलं …

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं

Maharashtra Weather News : मान्सूननं (Monsoon) देशात हजेरी लावल्यानंतर दक्षिणेकडील राज्य आणि महाराष्ट्राचा काही भाग …