क्रिकेटर मयांक अग्रवालनं आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? ऐकून तुम्हीही विचारात पडाल

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मयांक अग्रवालनं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली.  अग्रवालनं सांगितलं की, त्यांच्या मुलाचा जन्म या महिन्याच्या 8 तारखेला झाला असून आम्ही त्याचं नाव ‘आयांश’ (Aayansh) ठेवलंय.

मयांक आणि आशिताचं लग्न 4 जून 2018 रोजी झालं होतं. यापूर्वी दोघांनी एकमेकांना सात वर्षे डेट केलं होतं. दोघे बंगळुरूमध्ये भेटले होते, जेथे त्यांच्या पालकांनी दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन केलं होतं. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 

मयांक अग्रवालचं ट्वीट-

 

मयांक अग्रवालची सोशल मीडिया पोस्ट
मयांक अग्रवालनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली.  “आम्ही कृतज्ञ अंतःकरणानं अयांशची ओळख करून देतो. प्रकाशाचा पहिला किरण, आमच्या परिवारातील एक भाग आणि देवाकडून मिळालेली भेट. 08-12-2022”

हेही वाचा :  भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबाबत A to Z माहिती

मयांक अग्रवाल पंजाबच्या संघातून रिलीज
आयपीएलच्या मागच्या हंगामात मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. एवढेच नव्हेतर पंजाबच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थानही मिळवता आलं नाही. यामुळं पंजाबच्या संघानं आयपीएल 2023 च्या ऑक्शनपूर्वी मयांक अग्रवालला रिलीज केलं. आगामी आयपीएल 2023 साठी मयांक अग्रवालनं त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये ठेवली आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव होणार आहे. अग्रवालचा मागचा हंगाम चांगला गेला नसेल, पण तो किती आक्रमक फलंदाज आहे? हे सर्वांनाच माहीत आहे.

मयांक अग्रवालची आयपीएल 2022 मधील कामगिरी
मयांकनं आयपीएलच्या मागच्या हंगामात 13 सामने खेळले. ज्यात त्यानं 16.33 च्या सरासरीनं आणि 122.5 च्या स्ट्राइक रेटनं फक्त 196 धावा केल्या. मात्र, या हंगामातील कामगिरी बाजूला ठेऊन अग्रवाल पुढील हंगामात चांगली कामगिरी करण्याचा विचार करेल. भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनची पंजाब संघाच्या नव्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

हे देखील वाचा-

IND vs BAN Test Series Schedule: भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

हेही वाचा :  गुजरातच्या संघासाठी खूशखबर! हार्दिक पांड्याने यो यो टेस्ट केली पास



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …