रिलीजच्या एक दिवस आधीच शाहरुखचा ‘Pathaan’ ऑनलाईन लीक!

Shah Rukh Khan Pathaan Leaked Online : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) चार वर्षांनी ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. उद्या (25 जानेवारी 2023)  हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमाच्या निर्मात्यांसाठी आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, Tamilrockers, Filmy4wap, Filmyzilla, Mp4movies, Pagalworld, आणि  Vegamovies सारख्या वेबसाईटवर ‘पठाण’ हा सिनेमा रिलीजआधीच लीक करण्यात आला आहे. या सर्व वेबसाईटवर ‘पठाण’ हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये उपलब्ध आहे. 

कोरोनामुळे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. पण शाहरुखच्या चाहत्यांना ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ची उत्सुकता आहे. हजारो रुपये खर्च करत ते या सिनेमाची तिकीट विकत घेत आहेत. दरम्यान हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा फटका बसणार आहे.

निर्माते उचलणार मोठं पाऊल…

‘पठाण’ हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला तर अर्थातच या सिनेमाच्या कमाईवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. रिलीजआधीच बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणारा हा सिनेमा प्रेक्षक आता घरबसल्या पाहत आहेत. त्यामुळे आता ज्या वेबसाईटवर ‘पठाण’ सिनेमा लीक झाला आहे त्या वेबसाईटवर निर्माते कारवाई करण्याची शक्यता आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

हेही वाचा :  पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड

news reels New Reels

ट्रेलरदेखील झालेला लीक…

‘पठाण’ सिनेमाआधी या सिनेमाचा ट्रेलरदेखील लीक झाला होता. ट्रेलरची झलक, शाहरुखचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे रिलीजआधीच ‘पठाण’ सिनेमाचा अंदाज चाहत्यांना आला आहे. 


‘पठाण’ किती कमाई करणार? 

‘पठाण’ या सिनेमाने रिलीजआधीच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 45 ते 50 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येही या सिनेमाला जादू दाखवण्यात यश आलं आहे. त्यामुळे ‘पठाण’ हा सिनेमा पहिल्याच वीकेंडला 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. 

संबंधित बातम्या

Pathaan : 57 वर्षांचा किंग खान! 30 वर्षांपेक्षा अधिक काळ सिनेविश्वात कार्यरत; आजही चाहत्यांमध्ये शाहरुख खानची क्रेझ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …