rbi again bans paytm payments bank from opening new accounts zws 70 | पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यावर निर्बंध


बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : पेटीएम पेमेंट्स बँकेला पुढील आदेश येईपर्यंत नवीन ग्राहकांची खाती उघडता येणार नाहीत, असे फर्मान रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी दिले. बँकेला तिच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीचे सर्वसमावेशक परीक्षण करण्यासाठी त्रयस्थ ‘आयटी ऑडिट’ कंपनी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बँकेत आढळून आलेल्या देखरेख आणि पर्यवेक्षणविषयक त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत अधिकारांचा वापर करीत रिझव्‍‌र्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला तात्काळ प्रभावाने, नवीन ग्राहक जोडण्यास थांबवण्याचे निर्देश शुक्रवारी दिल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले.

माहिती-तंत्रज्ञान प्रणालीच्या परीक्षणाच्या अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर, रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे प्रदान केलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन  बँकेला नवीन ग्राहकांना सामावून घेता येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेची ऑगस्ट २०१६ मध्ये स्थापना होऊन, मे २०१७ मध्ये नोएडा येथील शाखेतून तिचे औपचारिकपणे कार्यान्वयन सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी क्षेत्रातील बँकांबाबत रिझव्‍‌र्ह बँकने कारवाईची पावले अनेकदा टाकली आहेत.  डिसेंबर २०२० मध्ये, एचडीएफसी बँकेला कोणतीही नवीन डिजिटल उत्पादने किंवा सेवा प्रस्तुत करण्यापासून आणि बँकेबाबत आढळून आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण होईपर्यंत नवीन क्रेडिट कार्ड वितरित करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेने मनाई केली होती.

हेही वाचा :  Skin Care: तुमच्या ‘या’ ५ चुकीच्या सवयींमुळे चेहर्‍यावर येऊ शकतात मुरुम, अशा प्रकारे घ्या त्वचेची काळजी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या …

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. …