Shah Rukh Khan : शाहरुखच्या ‘Pathaan’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार

Shah Rukh Khan Pathaan Trailer On Burj Khalifa : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आऊट झाला आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर झळकणार आहे. 

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खान (King Khan) सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुखने ‘इंटरनॅशनल लीग टी 20’साठी (I L T20) दुबईच्या स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे. 

‘पठाण’ या बहुचर्चित सिनेमाच्या ट्रेलरचं आज जगातील सर्वात उंच इमारतीवर बुर्ज खलिफावर स्क्रीनिंग होणार आहे. यशराज फिल्म्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘पठाण’ या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरू असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालणार आहे. 

हेही वाचा :  'ग्लोबल आडगाव' या बहुचर्चित मराठी चित्रपटाची कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स

शाहरुखचे चाहते ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 


संबंधित बातम्या

Shah Rukh Khan: पठाणच्या ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ ची शाहरुखच्या चाहत्यांनी केली जय्यत तयारी; 50 हजारपेक्षा जास्त फॅन्स पाहणार चित्रपट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …