भारतात लवकरच आपोआप दुरुस्त होणारे रस्ते? NHAI ने सुरु केलं काम; खड्ड्यांची समस्या कायमची संपणार

Self Healing National Highways In India: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नेतृत्वाखालील रस्ते वाहतूक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सध्या एका अनोख्या तंत्रज्ञानासंदर्भात चापपणी सुरु आहे. हे तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरता आलं तर रस्त्यांच्या देखभाल करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून जाईल. या तंत्रज्ञानामध्ये रस्ते स्वत:हून म्हणजेच आपोआप दुरुस्त होतील. यासाठी सेल्फ हिलिंग म्हणजेच आपोआप खड्ड्यांमध्ये भरलं जाणाऱ्या खास पद्धतीच्या सिमेंटचा वापर केला जाईल. यामुळे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा कायमचा निकाली निघण्यास मदत होईल. भारतात सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागतात.

कायम स्वरुपी उपाय

“आम्ही सध्या भारतात तयार केलेली आणि अपारंपारिक पद्धत वापरुन रस्ते दिर्घकाळ टीकेवत अशा दृष्टीने प्रयत्न करत आहोत. या माध्यमातून आम्ही रस्त्यावरील खड्ड्यावर कायम स्वरुपी उपाय शोधण्याच्या प्रयत्नात आहोत,” असं एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘इकनॉमिक टाइम्स’ला सांगितल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. 

हेही वाचा :  सामुद्रिक शास्त्र: डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव अन् नशीब, तपकिरी डोळे असलेले लोक…

चाचपणी सुरु

मात्र हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्याआधी याचा खर्च किती येतो, हे मोठ्या प्रमाणात वापरता येईल का? याचा अपेक्षित परिणाम होईल का? ते परिणामकारक असेल का? या साऱ्या गोष्टींची चाचपणी केली जात आहे. सेल्फ हेलिंग सिमेंटच्या गुणधर्मांचा वापर करुन रस्त्यांवर वारंवार पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या निकाली काढता येणार आहे. “यामुळे रस्त्यांचं आयुष्य वाढेल. खास करुन रस्त्यांच्या देखभालीचं काम पूर्णपणे बंद होईल. तसेच यामुळे वाहतुकीची समस्याही निकाली निघेल,” असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताचं प्रमाण मोठं

राष्ट्रीय महामार्गांवरील खड्ड्यांमुळे भारतात होणाऱ्या अपघातांचं प्रमाण 22.6 टक्क्यांनी वाढलं आहे. 2021 मध्ये 3635 रस्ते अपघात खड्ड्यांमुळे झालेले. आता हा आकडा 4446 वर पोहोचला आहे. या अपघांमध्ये एकूण 1856 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कसं काम करणार हे तंत्रज्ञान?

या विशेष सिमेंटला एकसंध पकडून ठेवणाऱ्या घटकामध्ये स्टीलचे तुकडे मिसळले जातात. त्यामुळे हे सिमेंट गरम होऊन पसरते. या खास प्रकारच्या सिमेंटला त्यामध्ये मिसळलेल्या धातुच्या तुकड्यांच्या माध्यमातून उष्णता दिल्यास ते दगड आणि मातीला घट्ट पकडून ठेवते. हे सिमेंट वापरुन रस्त्यावरील भेगा भरल्या जातात आणि रस्त्यांची दुरुस्ती होते.

हेही वाचा :  काळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण

2600 कोटींचा निधी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये 2,600 कोटींचा निधी रस्त्यांच्या देखभालीसाठी दिला आहे. मागील वर्षी हाच निधी 2573 कोटी इतका होता.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …