शरद पवारांनी काय केलं? म्हणणाऱ्या मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर; शेअर केला भाषणाचा ‘तो’ Video

Maharastra Politics : शिर्डीतील (Shirdi) जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माजी कृषीमंत्री राहिलेल्या पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत केला. मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी (Narendra Modi) केली. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोस्ट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ देखील शेअर केला.

पंतप्रधान मोदी राष्ट्र बळकटीचं काम करत आहेत. म्हणून विकासाचा हाच धागा पकडून आपण भाजसोबत गेल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिर्डीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी मोदींचं कौतूक केलं. मात्र, मोदींनी अजित पवारांसमोर काका शरद पवार यांना टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात (Mahrastra Politics) चर्चेला उधाण आलं आहे.

किती हा विरोधाभास, असं म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती, असं जयंत पाटील म्हणतात.

हेही वाचा :  चंद्रावर उमटली अशोकस्तंभाची छाप? व्हायरल होणाऱ्या फोटोमागची गोष्ट काय

पाहा Video

2024 मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. मोदी पंतप्रधान होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं शिंदेंनी शिर्डीतील जाहीर सभेत बोलताना सांगितलं. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. कितीही लोकं एकत्र आले तरी इंडिया आघाडी मोदींचं काहीच बिघडवू शकत नाही, असा हल्लाबोल शिंदेंनी केला.

आणखी वाचा – Kolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?

दरम्यान, साईबाबांच्या दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत उभे राहण्यापासून भाविकांची लवकरच सुटका होणार आहे. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेच आज पंतप्रधानांकडून लोकार्पण होणार आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …