Sharad pawar: ‘सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही’, शरद पवार यांचा आगडोंब!

Sharad pawar On Narendra Modi : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार ‘व्यक्तीगत निर्णय’ घेतील आणि भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. सर्व समीकरण जुळत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवारांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

काय म्हणाले Sharad pawar ?

सत्यपाल मलिक हे भाजपच्या विचारांचे होते. जम्मू कश्मिरमध्ये (J&K) असणाऱ्या राज्यपाल मलिक त्याची नियुक्ती भाजपने (BJP) केली होती. पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला, असं मलिकांनी सांगितलं. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितलं. पण त्यांना न बोलण्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा कोणताही अधिकार नाही, असं म्हणत शरद पवार (Sharad pawar) यांनी रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा :  पडळकरांचा माईक बंद करा, मार्शल बोलावून..., नीलम गोऱ्हे चांगल्याच भडकल्या; पाहा नेमकं काय झालं? पाहा Video

राष्ट्रवादीत काय चाललंय?

अजित पवार (Ajit Pawar) वेगळा विचार करत भाजपमध्ये जातील असं वाटत नाही, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. तर अजित पवार आल्यास महायुती भक्कम होईल, असं वक्तव्य शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीत सर्व अलबेल आहे का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

सुप्रिया सुळे म्हणतात…

अजित पवार कालच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत होते. मात्र आज एका कार्यक्रमाला आले नाहीत म्हणून लगेच चर्चा करण्यात अर्थ नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास घेतलाय.

आणखी वाचा  – Maharashtra Bhushan Award : राज ठाकरेंचा राज्य सरकारला सवाल, तर सांस्कृतिक मंत्र्यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

नेमकं प्रकरण काय?

राज्याच्या राजकारणात अस्थिरता दिसत असताना आता राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. अजित पवार लवकरच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची जागा घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातीये. तर शरद पवार आणि कुटुंबियांवर मोदी सरकार दबाव टाकत असल्याचं संजय राऊत यांनी सामन्याच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा पहाटेची साखरझोप मोडणार की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

हेही वाचा :  लोकसभा जागावाटपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं,' योग्य सन्मानाप्रमाणे...'



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात… कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर …