Mother Day Special : ‘आई’साठी बनवा स्पेशल शुगर फ्री बदाम बर्फी, जाणून घ्या रेसिपी

Mother’s Day 2023 Special Sugar Free Badam Burfi Recipe in Marathi : आई प्रत्येकासाठी खास असते आणि तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा खास असतो. हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो म्हणजेच यंदा 14 मे 2023 रोजी (Mother Day 2023) साजरा करण्यात येणार आहे. या खास दिवशी आपण आपल्या आईला अनेक भेटवस्तू देतो आणि तिच्याबद्दल आपले प्रेम देखील व्यक्त करत असतो. यंदा ‘मदर्स डे’च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईसाठी काही खास गोष्टी करू शकता. गोड डिश म्हणून शुगर फ्री बदाम बर्फी बनवून तुम्ही तुमच्या आईला सरप्राईज देवू शकता. तुम्ही जर पहिल्यांदाच बदाम बर्फी बनवत असाल तर जाणून घ्या रेसिपी… (Sugar Free Badam Burfi Recipe in Marathi)

शुगर फ्री बदाम बर्फी बनवण्यासाठी साहित्य

खवा -1 ते 1/2 कप, पिस्ता, अंजीर, अक्रोड (बारीक चिरून)- अर्धा कप, वाळवलेली फळे-अर्धा कप, वेल्ची पावडर – टीस्पून, जायफळ पावडर – एक ते दोन चिमूटभर, शुगर फ्री, बदाम – 1 कप

हेही वाचा :  महाराष्ट्रातील दंगलींमागे कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले "हे सगळं..."

शुगर फ्री बदाम बर्फी बनवण्याची पद्धत

कढईत खवा, सुक्या मेव्याचे तुकडे घेऊन मंद आचेवर हलवत रहावे. काही वेळाने वालवेलीची फळे, वेलची पावडर, जायफळ पावडर टाकून चांगले हलवावे. त्यानंतर भांड्याला तूप लावून मिश्रण त्यात ओतून एकसारखे करून थंड होऊ द्यावे. थंडी झाल्यानंतर वड्या पाडाव्यात.

वाचा : महागातली भेटवस्तू नको, पण आईसाठी ‘इवलासा’ प्रयत्न करा; तिलाही बरं वाटेल

वैशिष्ट्ये

सुक्या मेव्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. उदा. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लाख इ., त्यामुळे चवीस उत्तम आणि आबालवृद्धांना उपयुक्त आहे. साखर नसल्यामुळे फक्त मधुमेही व्यक्तीही खाऊ शकतात. लहान मुलांसाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे.

मातृदिन साजरा केला जातो का?

मध्ययुगीन काळात लोक काही कारणाने घराबाहेर गेलेले असतात. त्यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आपल्या प्रांतात जाऊन आपल्या आईला भेटण्याची प्रथा सुरु केली. त्या दृष्टीने या महिन्याचा दिवस म्हणजे आईला सन्मान देण्याचा दिवस मानला जातो. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील अॅना जार्विस यांच्या आईने स्त्रियांचे आरोग्य आणि परस्परांमधील मैत्री वाढवण्यासाठी महिला गटांचे आयोजन केले होते. यामध्येच मातृदिनाच्या उगमाचे मूळ आहे. अॅना जार्विस यांच्या आईच्या मृत्यूनंतर तिने आपल्या आईच्या स्मरणार्थ मातृदिन सुरू केला.

हेही वाचा :  Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …