पठाणची काश्मिरमध्ये जादू; तब्बल 32 वर्षांनी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड

Pathaan Housefull:  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan)  आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा पठाण (Pathaan)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून शाहरुख खाननं चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं. पठाण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखच्या चाहत्यांनी या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग केलं. काही चाहत्यांनी तर अख्खं थिएटर बुक केलं होतं. आता पठाणच्या कामगिरींच्या यादीत आणखी एका कामगिरीचा सामवेश झाला आहे. पठाण चित्रपटामुळे आता काश्मिर खोऱ्यातील  (Kashmir Valley)  एका थिएटरबाहेर तब्बल 32 वर्षांनी हाऊसफुल्लचा बोर्ड  लागला आहे. 

काश्मीर खोऱ्यातील थिएटरबाहेर  32 वर्षांनंतर ‘हाऊसफुल’ बोर्ड लागला. मल्टिप्लेक्स चेन INOX Leisure Ltd ही माहिती दिली आहे. आयनॉक्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करुन काश्मिर खोऱ्यातील थिएटर हाऊसफुल्ल झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ’32 वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यातील थिएटरमध्ये  हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. आम्ही किंग खानचे आभारी आहोत! धन्यवाद’, असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

पठाणनं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 100 कोटींची कमाई केली आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे.  पठाण शाहरुखनं या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.  पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या चित्रपटातील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिका पादुकोण सोबतच जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली.

हेही वाचा :  ‘खूप चुकलो! आता पुन्हा शेंगदाणे विकेन’, ‘कच्चा बदाम’ फेम गायक भुवन बड्याकरला झाली उपरती!

महत्वाच्या इतर बातम्या: 

Pathaan Box Office Collection Day 1: ‘पठाण’ची बॉक्स ऑफिसवर हवा! पहिल्या दिवशी कमावले एवढे कोटी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …