शाहरुखचा ‘पठाण’ ओपनिंग डेला किती कमाई करणार? जाणून घ्या…

Pathaan Box Office Collection Day 1 Prediction : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा आज (25 जानेवारी 2023) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. पण आता दिवस संपत आला असून या सिनेमाच्या ओपनिंग डे कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

ओपनिंग डेला ‘पठाण’ किती कमाई करणार? (Pathaan Opning Day Collection)

सिने विश्लेषक रोहित जयसवाल यांच्या ट्वीटनुसार, ‘पठाण’ हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 56 कोटींची कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर सिने विश्लेषक सुमित कडेलने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओपनिंग डेला ‘पठाण’ 50 कोटींपेक्षा अधिक कमाई करू शकतो. त्यामुळे एकंदरीतच रिलीजच्या पहिल्या दिवशी (Pathaan Box Office Collection) ‘पठाण’ 50 कोटींचा गल्ला जमवू शकतो. 

news reels New Reels

‘पठाण’मध्ये भाईजानची लक्षवेधी झलक!

‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. शाहरुखसह या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडियादेखील मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात बॉलिवूडचा बादशाह रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. तर भाईजान सलमान खानची (Salman Khan) लक्षवेधी झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याने या सिनेमात टायगरचे पात्र साकारले आहे. 

हेही वाचा :  'दसरा' नं रिलीज आधीच केली कोट्यवधींची कमाई; अभिनेता नानीचा चित्रपट ठरणार ब्लॉकबस्टर?

‘पठाण’ची रेकॉर्डब्रेक कमाई!

‘पठाण’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या सिनेमाने 24 कोटींपेक्षा अधिक कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. आज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. पीव्हीआर (PVR) 9.40 कोटी, आयनॉक्स 7.05 कोटी (Inox) आणि सिनेपोलिस (Cinepolis) 3.90 कोटींची कमाई सिनेमाने केली आहे. एकूण 20.35 कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे…

शाहरुखसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा बहुचर्चित ‘पठाण’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. ‘पठाण’नंतर शाहरुखचे ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच राजकुमार हिरानी आणि शाहरुखने एक व्हिडीओ शेअर करत ‘डंकी’ सिनेमाची घोषणा केली होती. तसेच ‘जवान’ सिनेमातील शाहरुखचा लुकदेखील समोर आला आहे. ‘पठाण’प्रमाणे या सिनेमातदेखील प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. एटलीने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं असून विजय सेतुपती या सिनेमात नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. 

हेही वाचा :  90s Actress On OTT : 'या' 90 च्या दशकातील अभिनेत्रींचा ओटीटीवर जलवा

संबंधित बातम्या

Pathaan Leaked Online : शाहरुखसह ‘पठाण’च्या टीमला मोठा फटका, रिलीजच्या काही तास आधीच….



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …