आयुष्यात सर्वच वाईट व निगेटिव्ह लोक भेटतात म्हणून आहात चिंतीत? मग असं होण्यामागची ही कारणं तुम्हाला माहितच हवी

तुमच्याही आसपास असे अनेक लोक असतील जे आयुष्यभर आनंदाने अविवाहित राहणे पसंत करतात. याचे कारण म्हणजे त्यांना सिरीयस रिलेशनशिप नको असते. परंतु असेही काही लोक आहेत जे काही परिस्थितींमुळे आयुष्यभर किंवा लग्नाचं वय निघून गेलं तरीही अविवाहितच राहतात. त्यांना त्यांच्या आवडीचा जोडीदार शोधण्यातच खूप अडचणी येतात आणि एवढेच नाही तर कधी कधी हाताशी आलेल्या गोष्टी फिस्कटतात.

‘मी अजूनही अविवाहित का आहे?’ या गूढ प्रश्नाचे उत्तर बहुतेक लोक आजही शोधत आहेत, तुम्ही सुद्धा त्यामधीलच एक असाल तर सिंगल असण्याची चूक कदाचित तुमची नसून तुमच्या काही सवयींची असू शकते हे लक्षात घ्या. अशा काही सवयी असतात ज्या कोणालाच आपल्या जोडीदारात असलेल्या आवडत नाहीत. पण आपल्याला माहितच नसतं की आपल्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या पहिल्याच भेटीत आपलं प्रेम आपल्यापासून हिरावतात. (फोटो सौजन्य -Istock)

मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे

मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे

कोणत्याही नात्यासाठी जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. कारण काही काळानंतर तुमच्या जोडीदाराला तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वाटू शकते. तुमची सदैव इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती मिळणे खूप अवघड आहे. प्रेम असो किंवा लग्न, लोक नेहमीच त्यांच्या नात्यात द्या आणि घ्या या नियमाचे पालन करतात. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास वाटण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असाल तर विश्वास ठेवा की तोही तुमचा दिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.

हेही वाचा :  कधीकाळी उस्ताद झाकीर हुसैन यांच्याकडे प्रवासासाठी खिशात नव्हता एक रूपया, मग पुढे…!

(वाचा :- लग्न केल्याचा आयुष्यभर होईल पश्चाताप आणि मॅरिड लाईफ होईल पार बरबाद, जर या 4 गोष्टींवर वेळीच दिलं नाही लक्ष..!)​

नात्यात खुलेपणा स्वीकारणे

नात्यात खुलेपणा स्वीकारणे

ज्यांना आपल्या जोडीदारासोबत फार मोकळेपणाने वागता येत नाही, त्यांना इच्छा नसतानाही एकटे राहावे लागते. तुमच्या जोडीदारासोबत मोकळे होण्याची भीती तुमच्या नात्याची वाढ रोखू शकते. याचे कारण असे की कोणालाच असा जोडीदार नको असतो ज्याला त्यांच्या मनात काय आहे हे कळू शकत नाही. नात्याच्या विकासासाठी जोडप्यांमध्ये चांगला संवाद खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही स्वतःला नात्यापासून स्वतःच दूर लोटत आहात.

(वाचा :- बायकोशी झालेलं भांडण न संपवता तुम्हीही झोपता? मग आहात भयंकर वाटेवर, या 5 लोकांचे अनुभव ऐकून फुटेल दरदरून घाम)​

नात्यात तडजोड चुकीची नाही

नात्यात तडजोड चुकीची नाही

कुणीतरी बरोबरच म्हटलंय की नातं टिकवायचं असेल तर दोन माणसांना आपापल्या परीने तडजोड करावी लागते. पण ज्या नात्यात कोणतीही तडजोड नसते, त्या नात्यात जोडप्यांमध्ये हेल्दी रिलेशनशिप टिकवणे खूप कठीण होऊन बसते. ज्या लोकांचे नाते जास्त काळ टिकत नाही त्यांच्या विभक्त होण्यामागे हेच एक कारण प्रमुख असते.

हेही वाचा :  माझं व नव-याचं कोणतंही प्रायव्हेट आयुष्य उरलेलं नाही, याला कारणीभूत हे दोन व्यक्ती ठरलेत

(वाचा :- सतत एक विचित्र प्रश्न विचारून सासरच्यांनी केलाय अक्षरश: जीव नकोसा, अट पूर्ण न केल्यामुळे लावतायत घाणेरडे आरोप)​

जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष न देणे

जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष न देणे

प्रत्येकजण स्वत: च्या गरजा आणि इच्छांची काळजी घेतो, परंतु ज्या लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून त्यांच्याकडून काय हवे आहे हे समजत नाही अशा लोकांना हेल्दी रिलेशनशिप राखणे देखील फार कठीण आहे. असे लोक केवळ त्यांच्या गरजा भागविण्यासाठीच राहतात. त्यामुळे अशा नात्यात जास्त प्रेम आणि ओढ टिकत नाही. तुम्हाला तुमचे नाते हेल्दी राखायचे असेल तर या सवयी सोडा आणि सांगितलेल्या सकारात्मक सवयी आत्मसात करा.

(वाचा :- वेटलॉस या एक शब्दामुळे आमचं नातं आहे कोर्टाच्या पायरीवर उभं, नव-याने बाबांदेखत काढलं बेडरूममधून बाहेर, मग नंतर)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …