‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. काल रात्री बारामतीमध्ये बँक मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरु होती असा दावा करणारा एक व्हिडीओही रोहित पवारांनी पोस्ट केला आहे. त्याचप्रमाणे कारमधून पैशांचा वाटप केलं जात होतं हे दाखवणारे काही व्हिडीओ त्यांनी पोस्ट केले आहेत. या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी थेट अजित पवार गटाचा हात असल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. ‘रात्री बारामतीत पैशांचा पाऊस पडला’ असा उल्लेखही या पोस्टमध्ये आहे.

मध्यरात्रीनंतर बँक सुरु

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत असून यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ! इथे अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार विरुद्ध शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्यादरम्यान लढत आहे. दोन्हीकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली असतानाच मतदानाला सुरुवात होण्याच्या काही तास आधी बारामतीत अगदी बँक मध्यरात्रीनंतर सुरु ठेवत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. 

हेही वाचा :  NCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा

बँकेचा ओव्हर टाइम असावा असा टोला

“पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा,” अशा खोचक कॅप्शनसहीत रोहित पवार यांनी या बँकेची शाखा रात्रीही सुरु होती असा दावा करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी, “निवडणूक आयोग दिसतंय ना?” असा सवालही विचारला आहे. “सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल,” असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस

“बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस..” असं म्हणत रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमध्ये कारमध्ये 500 च्या नोटा पडल्याचं दिसत आहे. तसेच या कारमध्ये घड्याळ चिन्ह असलेलं निवडणूक प्रचाराचं साहित्यही दिसत आहे. हा व्हिडीओ बारामती मतदारसंघातील भोर तालुक्यातील असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. “यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहे,” असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. 

यासाठी हवी होती का व्हाय दर्जा सुरक्षा?

“याचसाठी व्हाय दर्जाची सुरक्षा हवी होता का?” असा सवालही रोहित पवारांनी विचारला आहे. 

कारमध्ये 500 च्या नोटा अन् पक्षाचं प्रचार साहित्य

“विचारांची कास सोडलेल्यांना दिवसा सामान्य लोकांची कामं करता येत नाहीत. मात्र बारामती मतदारसंघात निवडून येण्यासाठी रात्रभर जे ‘उद्योग’ सुरू आहेत त्याचे हे व्हिडीओ,” असं म्हणत रोहित पवारांनी कथित पैसे वाटपाचे व्हिडी शेअर केले आहेत. तसेच रोहित पवार यांनी पैसेवाटप करण्याचा प्रयत्न झाला, “तरीही स्वाभिमानी मतदार विकला जाणार नाही,” असंही म्हटलं आहे. “अपेक्षा आहे निवडणूक आयोग झोपेत नसेल आणि यावर कायदेशीर कारवाई होईल,” असंही रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या प्रकरणावर अद्याप अजित पवार गटाने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र या प्रकरणावरुन राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. 

हेही वाचा :  खारघर दुर्घटनेवरुन ठाकरे बंधू आमने-सामने; राज ठाकरे उद्धव ठाकरेंना म्हणाले "उगाच ..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल

Monsoon in Maharashtra: महाराष्ट्रातील सर्व नागरिक सध्या उकाड्याने प्रचंड त्रस्त आहेत. खासकरुन मुंबई, पुणे सारख्या …

महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या सह्याद्रीच्या जन्माची गोष्ट

सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि …