अपयश आले तरी खचली नाही, जिद्दीने बनली उपजिल्हाधिकारी! वाचा वर्षाचा प्रेरणादायी प्रवास

MPSC Success Story : बादलेवाडीतील हा अल्पभूधारक त्यात दुष्काळी भाग. त्यामुळे गावातील जवळपास सर्वच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. आई आणि वडील अशिक्षित,पण मुलीच्या शिक्षणासाठी खूप धडपड असायची. या धडपडीच रूपांतरण मुलीने मात्र जिद्दीत केलं. वर्षा कोळेकर ही नुसती उच्च शिक्षित झाली नाहीतर तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाचवर्षी एमपीएससीतून ‘उपशिक्षणधिकारी व सहाय्यक वन संरक्षक’ अशा दोन पदांना गवसणी घातली आहे.

वर्षाचे शालेय शिक्षण हे महापालिकेच्या शाळेत झाले. त्यानंतर तिने गावाकडील विवेकानंद कॉलेजमध्ये घेतले.
तिच्या आई -वडिलांनी नेहमीच शिक्षणाला प्राथमिकता दिली आणि इतर गोष्टींना दुय्यम स्थान. त्यामुळे ती देखील उच्च शिक्षित झाली. पुढे तिने इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याचे निश्चित केले. बारावी सीईटीला चांगले मार्क पडल्यामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे प्रवेश मिळाला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एका खाजगी संस्थेकडून शिष्यवृत्ती मिळाली.

कुटुंबावरील बराचसा आर्थिक ताण कमी झाला. याच दरम्यान तिने स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. ज्ञानप्रबोधिनी संस्थेत मार्गदर्शन देखील घेतले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अथक परिश्रम घेत पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षापर्यंत मजल मारली परंतू अंतिम यादीत नाव आले नाही. तर दुसरीकडे विजया बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणूननोकरी लागली होती. नोकरीसाठी हजर होण्याचे पत्र मिळाले. अन् नेमकं त्याच वेळी यूपीएससीच्या दुसऱ्या प्रयत्नातील मुख्य परीक्षेच्या पेपर होता. या सर्व गोंधळात नोकरी सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा :  Current Affairs : चालू घडामोडी 08 मार्च 2022 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

ही बॅंकेतील नोकरी नाकारत यूपीएससी करण्यासाठी प्राधान्य दिले. त्यावेळी यूपीएससीची मुलाखतही दिली परंतू अंतिम यादीत नाव आले नाही. या संपूर्ण काळात ती खचली नाहीतर परिस्थितीवर मात करत लढली. परंतु पुन्हा एकदा यूपीएससीत अपयश आल्याने तिथेच थांबत एमपीएससीकडे मोर्चा वळवला. कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर २०१९ला एमपीएससीतून सहायक वनसंरक्षक अधिकारी व उपशिक्षणाधिकारी या दोन्ही परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले. पण तिने उपजिल्हाधिकारी ह्या पदाची निवड केली.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …