वयाच्या 40 नंतर शिल्पा शेट्टी त्वचेची अशी घेते काळजी

बॉलिवूड Diva शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी आणि सुंदर त्वचेसाठी ओळखली जाते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर ही शिल्पाच्या चेहऱ्यावरील तेज कमी झाले नाही. सोशल मीडियाच्या माध्यामतून शिल्पा नेहमीच तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. अशात ती तिच्या नितळ त्वचेची आणि आरोग्याची कशी काळजी घेते याबद्दल माहिती देते. शिल्पा तिच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच सजग असलेली पाहायला मिळते. शिल्पा तिची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी घरगुती वस्तूंचा अवलंब करते आणि त्यांनाच वापरण्यास प्राधान्य देते. तिची स्किन केअर रुटीन इतकी सोपी आहे की प्रत्येक महिला अवलंबू शकते, शिल्पा शेट्टीच्या स्किन केअर रुटीनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य :- @theshilpashetty)

पाणी पिणे

पाणी पिणे

शिल्पा स्वतःला हायड्रेट ठेवते. यासाठी ती खूप पाणी पिते याशिवाय ती नारळ पाणी आणि अशा फळांचे सेवन करते जे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात. त्यामुळे कोणत्याही सिझनमध्ये स्वत:ला हायड्रेटड ठेवा. दिवसभरातून साधारणपणे दोन लिटर पाण्याचे सेवन करा.
(वाचा :- 1 रूपयाही खर्च न करता कांद्याच्या सालीपासून घरीच बनवा डाय, पांढरे केस नैसर्गिकरित्या होतील काळेभोर)

हेही वाचा :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुलाचे पुण्यातील हॉटेल सील; PMC ची मोठी कारवाई

झोपण्यापूर्वी मेकअप काढणे

झोपण्यापूर्वी मेकअप काढणे

रात्री झोपण्यापूर्वी शिल्पा नक्कीच चेहरा स्वच्छ करते आणि त्वचेला संपूर्ण पोषण देते, यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. रात्रीच्या अंधारात आपल्या शरीराची वाढ होत असते. त्यामुळे रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे केमिकल राहणार नाही याची काळजी घ्या.
(वाचा:- सौंदर्यात सर्वांना टक्कर देते अथिया शेट्टी, हे आहे साऊथ इंडियन ब्युटीचे स्किन रुटीन)

नितळ त्वचेसाठी फेस पॅक

नितळ त्वचेसाठी फेस पॅक

शिल्पा पपईपासून बनवलेला घरगुती फेस पॅक लावते, पपई त्वचेला डागांपासून वाचवण्यासाठी आणि तरुण ठेवण्यास मदत करते. त्याचप्रमाणे रोज पपईचे सेवन केल्याने तुमची त्वचा डागविरहीत राहण्यास मदत होते.

(वाचा:- 59 वर्षीय नीता अंबानींच्या सौंदर्यापुढे नव्या नवरीची जादूही पडली फिकी, त्यांच्यासारख्या नितळ त्वचेसाठी खास टिप्स )

योगा करुन मिळेल नितळ त्वचा

योगा करुन मिळेल नितळ त्वचा

शिल्पाचा असा विश्वास आहे की योगा केवळ आरोग्यासाठीच नाही तर निरोगी त्वचेसाठी देखील आहे, तिला व्यायामानंतर ग्रीन टी किंवा कोरफडीचा रस पिणे आवडते. शिल्पाप्रमाणे तुम्ही देखील रोज योगा करु शकता.

(वाचा :- रोज चष्मा वापरल्याने नाकावर काळे डाग पडले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील जालीम )

हेही वाचा :  'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार

हेल्दी डाएट

हेल्दी डाएट

शिल्पा हेल्दी डाएट फॉलो करते, ती म्हणते की तिचा डायटिंगवर अजिबात विश्वास नाही, पण ती हेल्दी खाण्याला प्राधान्य देते. शिल्पा प्रमाणे तुम्ही देखील हेल्दी डाएट करु शकता. यामध्ये हिरव्यागार भाज्या आणि फळांचा समावेश होते.
(वाचा :- हिरव्यागार पालकाच्या भाजीमुळे मिळतील ऐश्वर्या राय सारखे घनदाट केस, या 6 पौष्टिक पदार्थांचा आहारात करा समावेश)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

जयेश जगड, झी मीडिया, अकोला (Akola News in Marathi) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. अशात …