कपाळावर हलकेसे परसलेले लाल कुंकू आणि गडद साडी, सब्यासाचीचे हेरिटेज ब्रायडल कलेक्शन जिंकून घेईल तुमचे मन

अनुष्का शर्माच्या लग्नापासून ते अगदी कतरिना कैफच्या लग्नापर्यंत सब्यासाची लेहंगा आणि साडी सर्वांनी नेसली होती. दीपिका पादुकोण, आलिया भट, कतरिना कैफ, पत्रलेखा यासारख्या सर्व सेलिब्रिटींनी आपल्या लग्नाच्या खास दिवशी सब्यासाची ब्रायडल कलेक्शन घातले होते. सध्या अनेक सामान्य तरूणींनाही सब्यासाची कलेक्शनची भुरळ पडली आहे. नुकतेच आपल्या सोशल मीडिया पेजवर सब्यासाचीने नव्या वर्षाचे ब्रायडल कलेक्शन लाँच केले असून या लाल रंगाने सर्वांनाच प्रेमात पाडले आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात असो अथवा अन्य ठिकाणी असो सवाष्णीसाठी लाल आणि हिरवा रंग खूपच महत्त्वाचा असतो. या कुंकवाच्या लाल रंगाचा वापर करून सब्यासाचीने तयार केलेले हे हेरिटेज कलेक्शन मनाचा ठाव घेणारे आहे. टाकूया एक नजर.

सिल्क बनारसी साडी

बनारसी साडी ही लग्नासाठी नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसते. यावरील नक्षीकाम आणि त्याचा रॉयलपणा सर्वांनाच भारावून टाकतो. सध्या बनारसी साड्यांचा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झाला आहे. सब्यासाचीच्या या मॉडेलने नेसलेली हेरिटेड बनारसी साडी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यावर तिने घातलेला क्लासिक थ्रेड टेक्स्चरचा ब्लाऊजही अत्यंत आकर्षक आहे. बनारसी साड्या नेसायला जड असतात मात्र त्याचा लुक रॉयलच दिसतो. त्यामुळे लग्नात अशा साड्यांची निवड तुम्ही रिसेप्शनसाठी नक्कीच करू शकता.

हेही वाचा :  अवघ्या दीड वर्षात मोडला प्रेमाचा संसार; पुण्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

रॉ सिल्क लेहंगा आणि ट्युल दुप्पट्टा

हल्ली महाराष्ट्रीयन लग्नामध्येही रिसेप्शनला लेहंगा घालण्याची पद्धत सुरू झाली आहे. साडीपेक्षा काही जणींना लेहंगा अधिक आरामदायी वाटतो. त्यातही लाल रंग असेल तर तो अधिक उठावदार दिसून येतो. सब्यासाचीने कलेक्शनमध्ये लाल कुंकू रंगाचा वापर केला आहे. जो अधिक काळजाचा ठाव घेतो. यामध्ये रॉ सिल्कचा वापर करण्यात आला असून त्यावर रेखीव नक्षीकाम करण्यात आले आहे. तर सब्यासाची हेरिटेज दागिन्यांचा वापरही करण्यात आला आहे. तर त्यावर सिल्व्हर नक्षीकाम केलेला दुपट्टा अधिक लक्ष वेधून घेत आहे.

(वाचा – Makar Sankranti 2023: संक्रांतीसाठी करा भाग्यश्रीसारखे साडी लुक, दिसा स्टनिंग)

मटका सिल्क लेहंगा आणि हेव्ही दागिने

नवरीचा लुक नेहमीच वेगळा दिसावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. सब्यासाचीने डिझाईन केलेला हा एम्ब्रॉईडेड मटका सिल्क लेहंगा मनात भरतो आणि आपल्याकडेही असा लेहंगा असावा असं नक्कीच एकदा तरी वाटून जातं. यासह अत्यंत कलाकुसर केलेली अशी वारसाहक्क जपलेले दागिने यासह मॉडेलने घातले आहेत. मटका सिल्क लेहंग्यावर बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे.

(वाचा – ‘प्राजक्तराज’ अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा साज, पारंपारिकता जपण्याचा प्राजक्ता माळीचा प्रयत्न)

हेही वाचा :  नागपुरात सिनेस्टाइल थरार; कुख्यात गुंडाला दारू प्यायला घेऊन गेले अन् त्याच्याच मित्रांनी...

मोकळे केस आणि भांगेतील लाल सिंदूर

भारतीय परंपरेनुसार भांगेत सिंदूर अर्थात लाल कुंकू भरण्याला अनेक ठिकाणी महत्त्व आहे. हेच लक्षात घेऊन या ब्रायडल कलेक्शनमध्ये लाल रंगाचा वापर करत सब्यासाचीने चार चाँद लावले आहेत. ही सुंदर मॉडेल नवरीच्या वेषात अप्रतिम दिसत आहे. तर तिने घातलेल्या लेहंग्याला सिंदूर आणि दागिन्यांमुळे अधिक शोभा आली आहे.

(वाचा – मराठमोळ्या ‘नागिन’ने सर्वांनाच लावलंय वेड, नजरेने आणि परफेक्ट फिगरने करतेय घायाळ)

नवरीचा पूर्ण लुक

नवरीच्या पूर्ण लुककरिता एम्ब्रॉयडेड मटका सिल्क लेहंगा ज्यावर नक्षीकाम करण्यात आले आहे असा घातला आहे. त्यावर नक्षीकाम केलेला दुपट्टा ओढून घेतला आहे. तर सब्यासाचीने डिझाईन केलेले हेरिटेज दागिने याची शोभा अधिक वाढवत आहेत. पण सर्वाधिक लक्षवेधी आहे ते म्हणजे लाल कुंकू आणि भारतीय परंपरेचा मेळ. अत्यंत अप्रतिम लाल रंगाचा वापर करून सब्यासाचीनी हा लुक पूर्ण केला आहे.

लाल रंगाचे कुंकू हे नेहमीच नवरीसाठी खास ठरते. याच लाल रंगाच्या कुंकवाचा उपयोग करत नवरी नक्की कशी असावी याचे एक छान उदाहरणच सब्यासाचीने घालून दिल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा :  कंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल

(फोटो क्रेडिटः @sabyasachiofficial Instagram)

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …