Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!

आजकाल आपण आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होत चाललो आहोत. विशेषतः कोरोनाचा हाहाकार माजल्यानंतर. अशा परिस्थितीत, कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण निश्चितपणे त्यातील दोष, वैशिष्ट्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तपासतो. शिवाय घरातही अशी एखादी वस्तू सापडली जी एक्सपायर झालेली आहे, तर आपण विचारही न करता ती फेकून देतो. पण आम्ही तुम्हाला सांगू की बाजारात असेही काही खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत जे तुम्ही एक्सपायरी डेटनंतरही खाऊ शकता. कारण त्यांची कोणतीही एक्स्पायरी डेट नसते आणि ते एक्सपायरी डेट नंतरही वापरता येतात. मित्रांनो, यामुळे तुमचे कोणतेही नुकसान नाही. चला तर अशा काही गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्याचा वापर एक्सपायरी डेटनंतर करता येतो.

सोया सॉस

सोया सॉस अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की ते अनेक दशके वापरले जाऊ शकते? परंतु हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा हा सॉस बनवताना कोणतेही ऍडिटीव्ह आणि प्रिझर्व्हेटिव्ह वापरले गेले नसतील. इतकेच नाही तर सोया सॉसची बाटली एकदा उघडलेली असली तरीही ती खूप दिवस टिकू शकते. याशिवाय मिठाच्या माध्यमातून त्याची शेल्फ लाइफही वाढवता येते.

हेही वाचा :  स्मार्टफोन वापरताना या चुका कधीच करू नका, फोनचे होणारे नुकसान जाणून घ्या

(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)

कॉफी

एक्स्पायरी डेटनंतरही तुम्ही कॉफी वापरू शकता. कारण प्री ब्रूड कॉफीचे एक मिश्रण सुकवून त्यापासूनच इन्स्टंट कॉफी बनवली जाते. ही कॉफी नंतर गरम हवेद्वारे पावडरच्या स्वरूपात तयार केली जाते. याशिवाय, कधीकधी कॉफी एकतर वाळवली जाते किंवा व्हॅक्यूमद्वारे फ्रीज केली जाते. कॉफी तयार करण्याची ही प्रक्रिया दर्शवते की त्यात जरासाही ओलावा नाही. याच कारणामुळे ही कॉफी एक्सपायरी डेटनंतरी सेवन करता येते.

(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)

मध

मध ही केवळ आजच नव्हे तर शतकानुशतके वापरल्या जाणार्‍या अन्न घटकांपैकी एक आहे. त्याच्या गुणधर्मांमुळे आणि पोषक तत्वांमुळे ती जगभरात वापरले जाते. यासोबतच, याचा समावेश अशा खाद्यपदार्थांमध्ये केला जातो ज्यांचा वापर तुम्ही एक्सपायरी डेटची चिंता न करता करू शकता. याशिवाय साखरेसाठी उत्तम पर्याय असणारी ही मध अनेक दशकांपर्यंत खाल्ली जाऊ शकतो. अट एवढीच आहे की ती डब्यात किंवा बाटलीत व्यवस्थित साठवून ठेवावी आणि त्यात कोणतीही भेसळ केलेली नाही याची खात्री करावी. आम्ही तुम्हाला सांगू की मध वर्षानुवर्षे टिकू शकते कारण त्यात पाण्याचे प्रमाण खूपच कमी असते आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असते. याच कारणामुळे मध लवकर खराब होत नाही आणि असे पदार्थ लवकर खराब होतात ज्यात लिक्विड पेय पदार्थ किंवा असे घटक ज्यामध्ये पाणी वापरले जाते.

हेही वाचा :  कियारापेक्षा सुंदर तिची जाऊबाई, किलर अदांनी लावली इंटरनेटवर आग, शालीन सौंदर्याचे लाखो दिवाने

(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)

मीठ

मीठ हा एक असा अन्नघटक आहे जो कधीही खराब होत नाही. हेच कारण आहे ज्यामुळे मिठाचा वापर लोणची, चटण्या आणि ड्राय स्नॅक्स संरक्षित ठेवण्यासाठी केला जातो. पण हे केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा मीठ आयोडीन किंवा इतर पदार्थांमध्ये मिसळलेले नसेल. कारण असे झाल्यावर मिठाचे नैसर्गिक गुणधर्म बदलू शकतात. समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार होते हे तुम्हाला माहीत असेलच. त्यामुळे त्याची खरी चव कधीच मिळत नाही. परंतु मीठ जमा होण्यापासून रोखण्यासाठी ते एडिटिव्स आणि फोर्टिफाइड पदार्थांनी मजबूत केले जाते, ज्यामुळे मिठाची शेल्फ लाइफ 5 ते 6 वर्षांनी कमी होते.

(वाचा :- Bappi Lahiri Death : घोरण्याशी संबंधित ‘या’ विचित्र आजारामुळे झाला बप्पी लहरींचा मृत्यू, या लोकांना असतो याचा सर्वाधिक धोका!)

साखर

कितीही दिवस अशीच साठवून ठेवली तरीही साखरेचा स्वाद व ती कधीच खराब होत नाही. तुम्ही ती वर्षानुवर्षे साठवून ठेवू शकता, त्यात असलेले पोषक तत्व कधीही नष्ट होत नाहीत.

हेही वाचा :  कर्करोग उपचारांसाठी स्टेम सेल थेरपी, स्टेम सेल्स म्हणजे नेमके काय

(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

उरले काही तास, राज्यात 8 मतदार संघात मतदान… दुसऱ्या टप्प्यात तिरंगी लढती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 89 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. …

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले ‘आता पुढील शिक्षण…’

Shrirang Barane Passed SSC Exam : शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच …