देवेंद्रजींनाही आवडलंय ‘मूड बना लिया’ गाणं, पण म्हणाले, नक्की ट्रोल होणार : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Main Mood Bana Liya Ay)हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचं काही लोक कौतुक करत आहेत, तर काही नेटकरी या गाण्याला ट्रोल करत आहेत. एका मुलाखतीमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना नवं गाणं कसं वाटलं? असा देखील प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नांना अमृता फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले. 

‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला खूप आनंद होत आहे. लोकांना हे गाणं आवडलं. लहान मुलं या गाण्यावर रिल्स तयार करत आहेत. लहान मुलांसोबतच मोठ्यांना देखील हे गाणं आवडत आहे, याचा मला आनंद होत आहे. माझा विश्वास आहे की, एखादी स्त्री कोणीही निगेटिव्ह कमेंट केली तरीही काम करत राहिली, तर नक्की पुढे तिला लोकांची साथ मिळते. ‘

हेही वाचा :  हेजलने शेअर केली खास पोस्ट; युवराजला म्हणाली, 'थँक्यू'

देवेंद्र फडणवीस यांना हे नवं गाणं कसं वाटलं? असा प्रश्न विचारल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देवेंद्रजींनी गाणं पाहिल्यानंतर मला सांगितलं की, गाणं चांगलं आहे. पण त्यांची पॉलिटिकल पोझिशन आहे, त्यामुळे हे गाणं नक्की ट्रोल होईल, असंही त्यांनी मला सांगितलं. या गाण्याला काही लोकांनी ट्रोल देखील केलं. मी त्यासाठी तयार होते.’

ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारल्यानंतर अृमता फडणवीस म्हणाल्या,’मला ट्रोल होण्याची सवय झाली आहे. मी देवाचं भजन जरी म्हणलं तरी लोक मला ट्रोल करतात. मी ट्रोलर्सचे आभार मानते. ट्रोलिंगचा मला फरक पडत नाही.’

live reels News Reels

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यावर हुकअप स्टेप करतानाचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना या गाण्यावर रिल  बनवण्याचं आवाहन केलं आहे.


मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत. त्याचं ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला दोन मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली. 

हेही वाचा :  फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता बाबूराजला अटक, काय आहे प्रकरण...

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Amruta Fadnavis : “मूड बना लिया” म्हणत अमृता फडणवीस थिरकल्या; चाहत्यांना केलं आवाहन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …