पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Viral News : पेट्रोलची टाकी फूल केली तर स्फोट होऊ शकतो असा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video होत आहे. उन्हाने पेट्रोलची (Petrol) टाकी तापली तर स्फोट (Blast) होण्याचा धोका अधिक असल्याचाही दावा करण्यात आलाय. हा दावा केल्यानं पेट्रोलची गाडी असलेल्यांच्या मनात भीती निर्माण झालीय. असे काही व्हिडिओही व्हायरल झाल्याने खरंच असं होतं का…? हा प्रश्न अनेकांना पडलाय.  देशात सध्या तापमान 40 अंशांपेक्षा अधिक असल्याने पेट्रोलची टाकी तापल्यास स्फोट होईल या भीतीने अनेकजण दुपारनंतर गाड्या बंद करून ठेवतायत. त्यामुळे व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली.

काय आहे व्हायरल मेसेज?
सोशल मीडियावर एक मेसेज जारी करण्यात आलाय. यात पेट्रोलची टाकी फूल भरली तर स्फोट होऊ शकतो. उन्हामुळे टाकी तापून स्फोट होण्याची भीती अधिक असल्याचं सांगण्यात आलंय. या दाव्याबाबत आम्ही ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याबाबत सत्यता जाणून घेतली. तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

व्हायरल पोलखोल
पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो हे खोटं असून कंपन्या गाड्या बनवतानाच पूर्ण सुरक्षेची काळजी घेतात. उष्णता असो किंवा थंडी असो कोणताही धोका नाही. स्पार्क झालं तरच पेट्रोल पेट घेतं असं तज्ज्ञांनी म्हटलंय. असे मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय. स्फोट होण्याचं कारण दुसरं असू शकतं. पण, पेट्रोलची टाकी फूल केल्याने स्फोट होतो हा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरला.

हेही वाचा :  top 5 electric cars sold in india know on which position tata nexon and tigor prp 93'या' आहेत देशात विकल्या जाणाऱ्या टॉप ५ इलेक्ट्रिक कार |

वाहनांना आग लागण्याची कारण
पेट्रोल आणि डिझेल टँकमध्ये लिकेज झालं असल्यास ते वाहनाच्या इतर भागांमध्य पसरतं. बाईकला किक मारताना काही वेळा त्यातून स्पार्क बाहेर पडतो किंवा उष्णतेने आग लागण्याची भीती असते. त्यामुळे वाहनांची वेळोवेळी निगा ठेवणे आणि सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. वेळोवेळी वाहनाची वायरिंग तपासणी करा. एलपीजी गॅसवर चालणारी वाहनांची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही कडक उन्हात कार उभी करत असाल तर कारच्या खिडक्या किंचित खाली करणे आवश्यक आहे. त्यामुळे कारमध्ये हवा खेळती राहील. बाईक असेल तर शक्यतो सावलीच्या ठिकाणी लावा.

इलेक्ट्रीक वाहनं असतील तर उष्णतेमुळे दुचाकी, चारचाकी वाहनातील बॅटरीचे तापमान वाढते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …