जबरदस्त लूक, फिचर्ससह Hero Karizma XMR नव्याने लाँच; Royal Enfield पेक्षाही स्वस्त

Hero Karizma XMR Price & Features:  कधी एकेकाळी चित्रपटांच्या माध्यमातून सर्वांसमोर येणारी करिझ्मा बाईक आता पुन्हा एकदा तिची ‘करिष्मा’ दाखवणार आहे. हिरो मोटोक़ॉर्पनं नुकतीच ही बाईक लाँच केली असून, सध्या सोशल मीडियावर तिची किंमत आणि फिचर्स याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. एका दिमाखदार सोहळ्यात कंपनीकडून  (Hero Karizma XMR) करिझ्मा एक्सएमआर लाँच करण्यात आली. जिथं तिची किंमत तुमच्या खिशाला परवडेल इतकीच असल्याचं समोर आलं. आश्चर्याची बाब म्हणजे रॉयल एनफिल्डच्या हाय एंड मॉडेलहूनही ही बाईक स्वस्त असल्यामुळं जर तुम्हाला रायडिंगची आवड असेल तर ही बाईक एक उत्तम पर्याय ठरु शकेल. 

काही वर्षांपूर्वी करिझ्माचा खप प्रचंड वाढला होता. ‘धूम’ चित्रपट त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत ठरला. पण, त्यानंतर मात्र ही लाटही ओसरली आणि पाहता पाहता बाईकचा खप कमी झाला. कंपनीच्या अडचणी वाढल्या परिणामी बाईकची भारतातील निर्मितीच बंद करण्यात आली. आता मात्र ही बाईक एका नव्या रुपात, नव्या फिचर्ससह आणि तितक्याच नव्या किमतीत सर्वांसमोर आली आहे. 

नव्या करिझ्माचे हार्डवेअर आणि इंजिन… 

करिझ्मामध्ये कंपनीकडून 17 इंचांचे अलॉय व्हील्स, दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल एबीएस देण्यात आले आहेत. बाईकला Y आकाराच्या एलईडी डीआरएलसोबत एलईडी हेडलाईट सेटअप दिले जातात. यामध्ये अॅजजस्टेबल विंडस्क्रीनचाही समावेश आहे. बाईकला रिअर व्ह्यू मिरर हँडलबारऐवजी फेअरिंगवर देण्यात आला आहे. यामध्ये फ्लूल टँक, क्लिप ऑन हँडलबार, स्प्लिट सीट सेटअप, एक्झॉस्ट आणि रिअर एलईडी लायटिंग देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  आता घाबरायची गरज नाही... तुम्ही Google वर काय सर्च केलं हे गुगल स्वत: 15 मिनिटात विसरणार

 

इंजिनबाबत सांगावं तर, या बाईकला 210 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 9250 आरपीएमवर 25.1 बीएचपी आणि 7250 आरपीएमवर 20.4 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो. 6 स्पीड गिअरबॉक्स असणाऱ्या या बाईकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच देण्यात आले आहेत. शिवाय बाईकला पुढे टेलिस्कोपिक आणि मागे मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहेत. 

इथंच सगळं संपत नाही… 

करिझ्माचे फिचर्स इथंच थांबत नाहीत. या बाईकला 210 ब्लूटूथ कनेक्टिविटी, डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देण्यात आलं आहे. ही बाईक खरेदी करायची झाल्यास तुम्ही 1,72,900 रुपये (एक्स-शोरूम) इतकी किंमत मोजता. बरं इथं तुम्हाला रंगांचे पर्यायही मिळतात ज्यामध्ये आयकॉनिक यलो, टर्बो रेड, मॅट फँटम ब्लॅकचा समावेश आहे. त्यामुळं तुम्हाला कोणता पर्याय निवडायचाय हे आताच ठरवा. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …