उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या…

Amruta Fadnavis On Urfi Javed : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नुकतच त्यांचं ‘आज मैंने मूड बना लिया है’ (Aaj Maine Mood Bana Liya Hai) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या लॉंच दरम्यान अमृता फडणवीस यांनी उर्फी जावेद (Urfi Javed Controversy) प्रकरणावर भाष्य केलं आहे.

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया (Amruta Fadnavis On Urfi Javed) 

उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस म्हणाल्या,”उर्फी जावेद प्रकरणावर मला नक्कीच बोलायला आवडेल. पण त्यासंदर्भात बोलण्याची ही वेळ नाही. आज माझी फक्त ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यासंदर्भात बोलण्याची इच्छा आहे. या गाण्यावर मला सर्वांना थिरकायला लावायचं आहे. तुम्हीदेखील या गाण्यावर डान्स करा… आणि उर्फीलादेखील डान्स करायला सांगा”. 

live reels News Reels

आता अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर उर्फी जावेद थिरकणार का? ‘आज मैंने मूड बना लिया है’ या गाण्यावर उर्फी थिकरल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. सध्या उर्फी जावेद प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा :  Sonam Kapoor : सायबर फ्रॉडचे शिकार, सोनम कपूरच्या सासऱ्यांना तब्बल 27 कोटींचा गंडा!

अमृता फडणवीस यांची अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी अमृता फडणीस यांचे ‘जय लक्ष्मी माता’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आले. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता अमृता फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे नवे गाणे रिलीज केले आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या गाण्याची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.

उर्फी जावेद तिच्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता चित्रविचित्र कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु, हा नंगानाच असाच सुरू राहणार असल्याचं उर्फी म्हणाली आहे.  

संबंधित बातम्या

Chitra wagh vs Urfi Javed : चित्रा वाघ-उर्फी जावेद यांच्यातील नेमका वाद काय? सुरुवात कुठून झाली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …