स्मार्टफोन वापरताना या चुका कधीच करू नका, फोनचे होणारे नुकसान जाणून घ्या

नवी दिल्लीः स्मार्टफोन खरेदी केल्यानंर काही दिवसात अनेक जणांचा फोन डेड होतो. किंवा हँग होतो. तो व्यवस्थित काम करीत नाही. परंतु, हे का होते, हे जाणून घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा स्मार्टफोन वापरताना काही चुका होतात. त्यामुळे फोनला नुकसान सोसावे लागते. स्मार्टफोन चार्ज करताना आपल्याला अनेक गोष्टीचे लक्ष ठेवावे लागते. तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे स्मार्टफोन चार्ज करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही खास गोष्टी सांगत आहोत. या चुका जर तुम्ही टाळल्या नाही तर तुमच्या फोनचे नुकसान होवू शकते.

जास्त वेळ फोनला चार्ज करू नका
स्मार्टफोन चार्ज करताना जास्त वेळ पर्यंत चार्ज करीत बसू नका. जर तुम्ही असे केले तर फोनला जास्त नुकसान होते. स्मार्टफोन कायमस्वरूपी डेड सुद्धा होवू शकतो. कारण, चार्जिंगचे थेट कनेक्शन स्मार्टफोनच्या मदरबोर्डशी असते. ज्यावेळी फोन चार्ज केला जातो त्यावेळी मदरबोर्ड हीट होत असतो.

ओरिजनल चार्जचा वापर करा
जेव्हाही तुम्ही स्मार्टफोनला चार्ज करीत असाल त्यावेळी नेहमी ओरिजनल चार्जरचा वापर करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या फोनची बॅटरी खराब होण्याची भीती आहे. प्रत्येक स्मार्टफोनला चार्ज करण्यासाठी एक चार्जर बनवले आहे. त्याच चार्जरचा वापर तुम्ही करावा. चार्ज करण्यासाठी अन्य दुसऱ्या चार्जरचा वापर करू नये. अन्यथा नुकसान होईल.

चार्जिंगवेळी गेमिंग

जर तुम्ही स्मार्टफोनला चार्जरवर लावले असल्यास त्यावेळी जर गेमिंग खेळत असाल तर तुमच्या फोनवर परिणाम होवू शकतो. तसेच तुमचा स्मार्टफोन कायमस्वरूपी बंद पडू शकतो. याच कारणामुळे तुम्ही ज्यावेळी फोनला चार्जिंगला लावत असाल त्यावेळी गेम खेळू नका. या चुका टाळल्यास फोनचे आयुष्य नक्की वाढू शकते.

हेही वाचा :  वसईः बहिणीच्या बर्थ-डेला जाताना काळाचा घाला; खड्ड्यांमुळे गमावला तरुणीने जीव

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासा

महिला आजकाल कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. मग ते राजकारण असो, खेळ असो किंवा डॉक्टर …

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानात आठ मतदारसंघातल्या उमेदवारांचं भवितव्य …