Bathing Habit : आजच सोडा अंघोळीबाबतची ‘ही’ घाणेरडी सवय, दीर्घायुष्यासाठी हार्वर्ड एक्सपर्ट्सनी सांगितली अंघोळ करण्याची योग्य पद्धत..!

स्ट्रोक ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदूच्या एका भागाला होणारा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो आणि मेंदूच्या पेशीभोवतीची जागा रक्ताने भरते. रक्ताच्या गुठळ्या किंवा उच्च कोलेस्टेरॉलच्या पातळीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये आलेल्या अडथळ्यामुळे हे घडते. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने मेंदूच्या आतील ऊतींचे नुकसान होते. स्ट्रोकमुळे अनेकदा हातपाय सुन्न होणे, बोलताना किंवा बोललेलं समजण्यास अडचण येणे, वर्तनात अचानक बदल होणे आणि चक्कर येणे असे प्रकार होतात. तसे तर स्ट्रोकसाठी इतर अनेक कारणे जबाबदार असू शकतात. पण आंघोळीची साधीशी सवय लावून घेतल्यास स्ट्रोकसारखा गंभीर धोका टाळता येऊ शकतो असे हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांचे मत आहे. ही सवय अगदी सोपी आहे आणि ती अंगीकारण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष उपकरणाचीही गरज नाही.

गरम पाण्याने अंघोळ केल्यास हृदय करेल

हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते, टबमध्ये गरम पाणी भरून त्याने आंघोळ केल्याने रक्तवाहिन्या (blood vessels) वाढण्यास मदत होते. वास्तविक, गरम पाण्याच्या टबमध्ये बसल्यावर शरीराला पाण्याच्या दाब आल्यामुळे हृदयाद्वारे पंप केलेल्या रक्ताचे प्रमाण देखील वाढते, ज्यामुळे हृदय देखील चांगले कार्य करते.

हेही वाचा :  Vaccination for kids : गुड न्यूज, मुलांचे करोना वॅक्सिनेशन झाले सुरू, वॅक्सिन देण्याआधी आणि दिल्यानंतर करा 'ही' 5 कामे, साइड इफेक्ट्सपासून होईल बचाव

(वाचा :- COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?)

रोज अंघोळ केल्यास

हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जे लोक दररोज आंघोळ करतात त्यांना हृदयविकाराचा धोका 28 टक्के कमी असतो. दररोज अंघोळ केल्याने स्ट्रोकचा धोका 26 टक्क्यांनी कमी होतो, असेही या अभ्यासात आढळून आले आहे. हा अभ्यास 30 हजार लोकांवर करण्यात आला आहे.

(वाचा :- Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच करा चेकअप!)

अंघोळ आणि स्ट्रोकचा काय संबंध?

हार्वर्डच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात झोपणे किंवा अंघोळ करणे याचा काय परिणाम होतो हे शोधून काढले. आधीच्या अभ्यासात रक्तदाब कमी करण्यासाठी आठवड्यातून 4 ते 7 वेळा आंघोळ करण्याचा समावेश होता. 2018 च्या अभ्यासात फिन्निश सौना युजर्सवर झालेल्या अभ्यासात लेखकांना असे आढळून आले की आंघोळीमुळे रक्तवाहिन्या चांगले काम करू लागल्या, सूज कमी झाली आणि खराब कोलेस्टेरॉलचे हेल्दी व चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर झाले. आंघोळ प्रत्येकासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, सर्वांना समान लाभ मिळतीलच असे नाही.

हेही वाचा :  Bone Cancer - सावधान, हाडांचा कॅन्सर होण्याआधी शरीर देतं ‘हे’ 5 संकेत, दुर्लक्ष करू नका अन्यथा गमवावा लागेल जीव..!

(वाचा :- Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!)

कोणत्या लोकांसाठी ही सवय सुरक्षित नाही

छातीत दुखत असलेले लोक, हृदयविकाराचा त्रास असलेले लोक आणि अनियंत्रित रक्तदाब असलेल्या रुग्णांनी ही सवय फॉलो करणे धोकादायक आहे. तज्ञांनी 70 आणि त्याहून अधिक वयाच्या कमी रक्तदाब असलेल्या लोकांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

(वाचा :- Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!)

अंघोळ केल्याने स्ट्रोकचा धोका कसा कमी होतो?

एकूणच आंघोळीचा एखाद्या व्यक्तीच्या स्ट्रोकच्या जोखमीवर सकारात्मक परिणाम होतो. या स्थितीवर उपचार न केल्यास ते एखाद्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकते. यामुळे तोंड एका बाजूला लटकणे, दोन्ही हात वर करण्यात अडचण येणे आणि अस्पष्टपणे बोलण्याची समस्या येणे आणि बोललेलं समजण्याची क्षमता कमी होणे यासारखी लक्षणे विकसित होण्याची शक्यता वाढते.

(वाचा :- Heart and Corona Risk : सावधान, हार्ट पेशंट्सवर करोना करतोय जोराचा आघात, कार्डियोलॉजिस्टने सांगितले काय करावं व काय नाही..!)

हेही वाचा :  Piles home treatment : भयंकर अवस्थेत पोहचलेला मुळव्याधही होऊ शकतो झटक्यात बरा, स्वयंपाकघरातील ‘या’ 4 गोष्टी ठरतील रामबाण..!

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

More Than 100 Killed In Fire At Wedding: इराकमधील नीनवे प्रांतातील हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (26 …

पाकिस्तानचा खालिस्तानी कट, ISI चं भारताविरोधात ऑपरेशन ‘K’

ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि …