COVID Mask : घाणेरडा मास्क वापरण्याची चूक अजिबात करू नका, थेट फुफ्फुसापर्यंत पोहचेल इनफेक्शन, मास्क एक्सपायर झाला हे कसं ओळखावं?

गेल्या एका महिन्यानंतर या आठवड्यात भारतात ओमिक्रॉन (Omicron) प्रकरणांमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे. पण कोरोना महामारी अजूनही संपलेली नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा वेळी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका निर्माण करू शकतो. हे लक्षात घेऊन घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास विसरू नका. करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मूलभूत पायऱ्यांपैकी ही एक पायरी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की योग्य पद्धतीने मास्क घातल्यास संसर्ग होण्याचा धोका 90 टक्क्यांनी कमी होतो. म्हणायला बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत, पण N-95 हा सर्वात चांगला मास्क मानला जातो.

संशोधन असे सूचित करते की एन-95 मास्क तुम्हाला कोविडपासून वाचवण्याचे काम कापडी मास्क आणि सर्जिकल मास्कपेक्षा चांगले करतात. याचे कारण म्हणजे श्वसन यंत्र हवेतील किमान 95 टक्के कण अडकवू शकतात आणि त्यांना तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतात. सर्वोत्तम भाग असा आहे की ते अनेक वेळा वापरले जाऊ शकतात आणि ते किफायतशीर देखील आहेत. तुम्ही बाजारातून सर्वात महागडा मास्क विकत घेतला तरी कालांतराने तो खराब होतो आणि तुम्हाला तो फेकून द्यावा लागतो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला N-95 मास्क किती दिवस वापरू शकता हे सांगणार आहोत.

हेही वाचा :  Cancer Causing Food : प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत 9 पदार्थ, तरीही दररोज खातात

मास्क कधीपर्यंत घालू शकतो?

N95 मास्कची किंमत सामान्य सर्जिकल मास्कपेक्षा जास्त आहे. अर्थात प्रत्येक वापरानंतर तुम्ही ते फेकून देऊ शकत नाही. तुम्ही ते धुतल्यानंतर पुन्हा वापरू शकता पण ते सुद्धा मर्यादित कालावधीसाठीच. तुम्ही N95 किती काळ वापरू शकता हे अनेक घटकांवर अवलंबून आहे.

(वाचा :- Symptoms of High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर येऊ शकतो हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल वाढल्यास डोळ्यांवर दिसतात ‘ही’ लक्षणे, लगेच करा चेकअप!)

खराब झाल्यानंतर मास्क सुरक्षा प्रदान करू शकत नाही

N95 मास्कमधील मुख्य गोष्ट म्हणजे त्याचा सील. एकापेक्षा जास्त वेळा वापर केल्यानंतर व मास्क धुतल्यानंतर सील तुटते किंवा मास्कमधून बाहेर पडते, याचाच अर्थ असा होतो की तो मास्क एक्सपायर झाला आहे. सील निघून गेल्यावर मास्क घालण्यात काहीच अर्थ नाही. कारण यामुळे हवा कोणत्याही फिल्टरच्या मदतीशिवाय आत आणि बाहेर जाऊ शकते. हे धूळ आणि विषाणूंना तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत मास्क घालण्याचा उद्देश सफल होणार नाही.

(वाचा :- Bleeding Piles : मुळव्याध झालाय? मग औषधं व सर्जरी सोडा, घरच्या घरी करा या 5 उपायांनी मिळवा मुक्ती..!)

हेही वाचा :  Health tips : सावधान, दिवसभर घालता फिटिंगवाली घट्ट जिन्स? होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार..!

फिटिंग सैल झाल्यास मास्क घालू नका

याशिवाय जर मास्कच्या पट्टीचे फिटिंग सैल झाले असेल किंवा मास्क तुमचा चेहरा झाकू शकत नसेल तर तुम्ही तो फेकून द्यावा. तथापि, काही प्रकरणांमध्ये मास्क खराब होत नाही पण त्याचा सील ब्लॉक होतो. त्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमचा N95 मास्क आता बदलावा याचेच हे संकेत असतात.

(वाचा :- Immunity booster foods : इम्युनिटी होईल 100 पट मजबूत, डाएटिशियनने सांगितले ब्रेकफास्ट, लंच व डिनरमध्ये काय खाणं गरजेचं..!)

मास्क बॅक्टेरिया फ्री बनवण्याची पद्धत

N95 मास्क बॅक्टेरिया मुक्त करण्यासाठी तुम्ही तो धुवू शकता. वापरा दरम्यान अंधा-या आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. लक्षात ठेवा रेस्पिरेटर उन्हात ठेवल्यास फिल्टरमध्ये अडकलेले कण तुटण्याची शक्यता जास्त असते. तज्ञ अनेक मास्क लावण्याची आणि सलग दिवसात एक मास्क वापरण्याची देखील शिफारस करतात.

(वाचा :- Heart and Corona Risk : सावधान, हार्ट पेशंट्सवर करोना करतोय जोराचा आघात, कार्डियोलॉजिस्टने सांगितले काय करावं व काय नाही..!)

25 वेळा घालू शकता N95 मास्क

25-n95-

एका अभ्यासानुसार, तुम्ही N-95 मास्क 25 वेळा सहजपणे घालू शकता. काही स्थितींमध्ये मास्क जर योग्य स्थितीत असेल आणि तुमचा चेहरा व्यवस्थित झाकून ठेवू शकत असेल तर तुम्ही ते ब-याच काळासाठी घालू शकता. आम्ही तुम्हाला सांगू की काही मास्कचे फिल्टर देखील बदलता येतात पण सुरक्षित राहण्यासाठी असे करण्याऐवजी नवीन मास्क विकत घेणे कधीही चांगले आहे.

हेही वाचा :  सेलिब्रिटीप्रमाणे साडी स्टाईल करण्यासाठी सोप्या टिप्स, या ७ गोष्टी लक्षात ठेवा

(वाचा :- Cold Chills After Eating : जेवल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते किंवा अंग थरथरू लागतं? मग असू शकतात ‘ही’ 6 कारणे!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

10 कोटी 74 लाखाची व्हेल माशाची उलटी जप्त; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

Kolhapur Crime News : कोल्हापूर मधील आजरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाठलाग करत तब्बल …

पोपटांनतर आता अजगर, मगर; संजय राऊत म्हणतात ‘भाजप’ सोबत आलेल्यांना खाऊन टाकतो

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पोपटावरुन कलगीतुरा रंगला होता. आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजगर आणि मगर …