Tag Archives: maharashtra news in marathi

दुर्मीळ रुद्राक्षाची साताऱ्यात लागवड

|| विश्वास पवार वाई : अतिशय दुर्मीळ असणाऱ्या रुद्राक्ष फळाची लागवड साताऱ्यात यशस्वी झाली आहे. शेतीमध्ये व घराच्या गच्चीवरही या रोपाची लागवड सहा वर्षांपूर्वी केली आणि आता या झाडाला पंचवीस रुद्राक्षाची फळे लागली असून ती पाहण्यासाठी सातारकराची गर्दी होत आहे.   रुद्राक्ष ही वनस्पती नेपाळ, बाली किंवा भारताच्या हिमाचल प्रदेश, काश्मीर या भागात आढळून येते. फक्त या परिसरात या झाडाची …

Read More »

संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले, “आमचं राजकारण नकलांवर…!”

संजय राऊत म्हणतात, “काही लोक आजारी नसतानाही सक्रीय नसतात. मुख्यमंत्र्यांइतकं सक्रीय सध्या कुणीच नाही. म्हणून तर राज्य पुढे चाललंय”! पुण्यामध्ये आज मनसेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. राज्य सरकार आणि विरोधकांवर निशाणा साधतानाच राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची नक्कल करताच उपस्थितांमध्ये तुफान …

Read More »

राज ठाकरेंनी केली राज्यपालांची नक्कल; म्हणाले, “..तेव्हा असं वाटलं राज्यपाल लगेच माझा हातच बघायला लागतील”!

राज ठाकरे म्हणतात, “रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी”! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानांवर मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात बरेच आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपालांवर त्यांच्या शैलीत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राज ठाकरेंनी राज्यपालांना …

Read More »

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले, “राज्यपालांनी आता तरी…!”

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत अनेक कारणांमुळे या दोन्ही घटनात्मक संस्थांमध्ये वाद झाले असून त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि अद्याप तोडगा न निघालेला वाद म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती. राज्य सरकारने पाठवलेल्या यादीवर अद्याप राज्यपालांनी …

Read More »

“नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलला;” चंद्रकांत पाटलांचा दावा

“आम्ही राज्यभर आम्ही लढा उभारू आणि तुमचं जगणं मुश्किल करून टाकू,” असंही पाटील म्हणाले. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी मात्र या आरोप प्रत्यारोपांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. दरम्यान, फडणवीस आणि भाजपाच्या …

Read More »

“राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाईंची चेष्टा केली त्याच्याविषयी विरोधी पक्षनेत्यांनी…”; राऊतांची टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या गौप्यस्फोटांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. फडणवीस यांनी राज्यातील सरकार भाजपाच्या मंत्र्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केल्यानंतर राऊत यांनी फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना या आरोपांसंदर्भात विचारणा करण्यात आली असता राऊत यांनी फडणवीस यांच्या आरोपांवर मत मांडलं. ईडीसंदर्भातील आरोपांवर का बोलत नाही?“विरोधी …

Read More »

रामदेव बाबांचं शिवसेना प्रमुखांबद्दल मोठं विधान, म्हणाले “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे…”

योगगुरू रामदेव बाबा योग शिबिरासाठी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ऐतिहासिक पतितपावन मंदिर या ठिकाणच्या वीर सावरकर स्मारक आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाला भेट दिली. यावेळी रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. “पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळेल असं एग्झिट पोलमधून दिसत आहे. काही लोकांना वाटलं होतं पाच राज्यांमध्ये भाजपा रसातळाला जाईल पण तसं होत नाहीये. सोशल …

Read More »

“…म्हणून महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्नच नाही;” जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

पार – तापी नर्मदा योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या हद्दीतून दिले जाणारे १५ टीएमसी पाणी गुजरातच्या उकाई धरणाच्या बॅक वॉटरमधून महाराष्ट्राच्या तापी खोऱ्यात परत मिळणे प्रस्तावित आहे. मात्र, त्यास गुजरात राज्याची संमती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही ,असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केला. …

Read More »

धनंजय मुंडे यांच्या कार्यशैलीवर स्वपक्षीयांकडून प्रश्नचिन्ह ; बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा

वसंत मुंडे, लोकसत्ता  बीड : बीडचा बिहार झाला आहे, पोलीस अधीक्षक हप्ते घेतात, येथपासून ते महिला आमदारही सुरक्षित नाहीत अशी चर्चा विधानसभेत राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी केली. चर्चेच्या परिणामी पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. या घटनेनंतर राष्ट्रवादीतील तीन आमदारांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे …

Read More »

जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट ; तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

अलिबाग –  जप्त केलेली स्फोटकं निकामी करतांना तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना,  महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड गावाजवळ घडली. जखमी झालेल्या पोलीसांवर महाड ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबईत हलविण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमीना मुंबईत नेत्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर ग्रीन कॉरीडोर तयार करण्यात आला होता.  महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट …

Read More »

महिला दिन विशेष : त्या दोघींनी घेतला पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दोन मुलींनी रायगड पोलीस अधिक्षक पदाचा अनुभव घेतला. पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. सिमरन घातानी आणि देवश्री निगडे या दोन मुलींनी पोलीस अधिक्षकांच्या खुर्चीत बसून या पदाची अनुभूती घेतली.  देवश्री निगडे हिला दुर्धर आजाराने ग्रासली होती. तर सिमरन घातानी ही अपघातातून थोडक्यात बचावली होती. या दोन्ही मुलींचे मनोबल उंचावण्यासाठी …

Read More »

“खडसे साहेब पैसे देतील, अजित पवार सपोर्ट करत नाही पण”; गिरीश महाजन प्रकरणात फडणवीसांनी फोडला पेनड्राईव्ह बॉम्ब

विरोकांना अडकवण्यासाठी खोट्या गुन्हे रचून सरकार पोलीस बळाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आमदार गिरीश महाजन यांना मोक्कामध्ये अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांमार्फत षड्यंत्र रचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यासंदर्भातील पुरावे देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्हच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. यामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत कसा कट रचला गेला हे देवेंद्र …

Read More »

महिला दिनाचे औचित्य साधून आसाराम बापूंच्या समर्थनार्थ मोर्चा, महिला म्हणतात बापू…

देशात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. याच महिला दिनाचे औचित्य साधून नांदेडमध्ये महिला उत्थान मंडळाच्या वतीने आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ आज ( ८ मार्च) मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आसाराम बापू यांची सुटका करावी अशी मागणी या महिलांनी केली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापू सध्या …

Read More »

HSC Exam 2022 : इंग्रजीच्या पेपरमध्ये शिक्षण मंडळाची चूक, एक गुण मिळणार, हे शक्य झालं आहे रतन टाटांमुळे कारण…

इयत्ता बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आहेत. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. कोणतीही तांत्रिक चूक होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. मात्र असे असतानाही शिक्षण मंडळाकडून एक मोठी चूक झालीय. याच चुकीमुळे मंडळाला विद्यार्थ्यांना एक आगावीचा गुण द्यावा लागणार आहे. या एका गुणाची लॉटरी लागल्यामुळे …

Read More »

“मंत्री आदित्य ठाकरेंना माझा सवाल आहे, की हा छापा…”, नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर!

नितेश राणे म्हणतात, “संध्याकाळी सात वाजेनंतर ते कुणासोबत उठ-बस करतात? ते कुणाच्या नाईट-लाईफचे सदस्य आहेत?” मुंबईत प्राप्तीकर विभागानं राहुल कनाल आणि संजय कदम यांच्यावर केलेल्या छापेमारीमुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राहुल कनाल हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. “हे छापे म्हणजे महाराष्ट्रावर आक्रमणच …

Read More »

“जेव्हापासून भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली…”, आदित्य ठाकरेंचा निशाणा, केंद्रावर गंभीर आरोप!

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांच्यावर प्राप्तीकर विभागानं छापे टाकले आहेत. प्राप्तीकर विभागानं आज सकाळीच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या मुंबईतील घरांवर छापे टाकले. यानंतर राज्यातल्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केलं जात असून महाविकास आघाडीकडून कारवाईचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमवीर प्राप्तीकर …

Read More »

वसईमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकाराची बिहारमध्ये आत्महत्या; समोर आले हत्येचे धक्कादायक कारण

सायली शहासने या तरुणीची वसईतील स्टेटस लॉजमध्ये हत्या करून फरार झालेला प्रियकर सागर नाईक याने बिहारच्या मुज्झफर नगर येथील एका लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. वसईच्या वसंत नगरी येथे राहणार्‍या सागर नाईक (२८) आणि सायली शहासने (२६) या तरुणीचे प्रेमसंबंध होते. शनिवार २६ फेब्रुवारी रोजी तो सायलीला घेऊन वसईच्या स्टेटस लॉजमध्ये आला होता. …

Read More »

७५ वर्षांच्या वृध्देवर लैंगिक अत्याचार करून खून करणारा नराधम दोषी; उद्या सुनावण्यात येणार शिक्षा

अक्कलकोट तालुक्यात एका ७५ वर्षांच्या वृध्देवर अमानुष लैंगिक अत्याचार करून नंतर तिचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल ४८ वर्षांच्या नराधमाला सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी धरले आहे. आरोपीचे कृत्य अतिशय रानटी आणि तेवढेच क्रूर असल्यामुळे हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ आहे. त्यामुळे आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. मंगळवारी आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मल्लप्पा बसवंत बनसोडे (रा. उडगी, …

Read More »

औरंगाबाद : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी बनावट आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र; बड्या अधिकाऱ्यांना नोटीस

अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी दोषारोपपत्रासह भलताच बनावट आरोपी उभा केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायाधीश व्ही. के. जाधव आणि न्यायाधीश एस. सी. मोरे यांनी औरंगाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. अहमदनगर रोडवरील ढोरेगाव येथील राधिका पेट्रोलपंपासमोर १८ फेबुवारी २०२१ रोजी सकाळी एका कारने मोटार सायकलस्वार …

Read More »

शेतीपंपास दिवसा वीज पुरवठ्याबाबत पंधरवड्यात निर्णय – उर्जामंत्री नितीन राऊत

शेतकरी वीज प्रश्नांवर कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे शेतीपंपास दिवसा १० तास वीज देण्याबाबतचा अहवाल येत्या १५ दिवसात तज्ञ समितीकडून घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवरी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला. तर राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी त्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे …

Read More »