तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करते. याचे काम किटाणूंना शरीराबाहेर ठेवणे किंवा त्यांचा नाश करणे हे आहे किंवा ते आत गेल्यास त्यांच्यामुळे होणारे नुकसान टाळणे हे आहे. न्युट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन शिखा अग्रवाल शर्मा यांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करता येईल? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला हे समजले पाहिजे की रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे हे एक दिवसाचे किंवा दोन दिवसांचे काम नाही. ही एक लांबलचक प्रक्रिया आहे आणि खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी आणि निरोगी जीवनशैलीचा त्यात मोठा वाटा आहे. सकस आहार घेणे, शारीरिक हालचाली करणे, चांगली झोप घेणे इत्यादी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हे जाणून घेऊया.
सकाळची सुरूवात अशी करा

आहारतज्ञांच्या मते, तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास हळदीचे पाणी प्यावे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यावे. हळदीच्या पाण्यासोबत एक चमचा धणे आणि दोन हिरव्या वेलच्या चावून खाव्यात.
(वाचा :- Heart and Corona Risk : सावधान, हार्ट पेशंट्सवर करोना करतोय जोराचा आघात, कार्डियोलॉजिस्टने सांगितले काय करावं व काय नाही..!)
नाश्त्यात काय खावे?

नाश्ता हलका आणि पौष्टिक ठेवावा. यासाठी तुम्ही पोहे बनवू शकता ज्यामध्ये तुम्ही अनेक भाज्या मिक्स करू शकता. याशिवाय प्रथिनांनी समृद्ध दलिया हा देखील एक चांगला पर्याय आहे. चपाती उरली असेल तर त्यात भाजी भरून फ्रॅंकीसारखी खाऊ शकता. यासोबत तुम्ही दुधाचा चहा किंवा कॉफी घेऊ शकता. चहामध्ये साखरेऐवजी स्टेवियाचा वापर करा.
(वाचा :- Cold Chills After Eating : जेवल्यानंतर तुम्हालाही थंडी वाजते किंवा अंग थरथरू लागतं? मग असू शकतात ‘ही’ 6 कारणे!)
लंचआधी फळे खावीत

तुम्ही नाश्त्यानंतर म्हणजे 10 किंवा 11 वाजेपर्यंत कोणतेही फळ खाऊ शकता. या दरम्यान तुम्ही पपई, अननस, किवी किंवा सफरचंद खाऊ शकता. ही सर्व फळे व्हिटॅमिन सी चे भांडार आहेत, जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे.
(वाचा :- Urination After Eating : सावधान, जेवल्यानंतर लगेचच लघवीला होत असेल तर ‘हे’ 6 सायलेंट आजार असू शकतात कारणीभूत..!)
लंचमध्ये काय खावे?

बरेच लोक दुपारच्या जेवणात सॅलड किंवा स्प्राउट्स खातात जे योग्य नाही. आपण दुपारचे जेवण योग्य पोटभर केले पाहिजे. जेवणात भाजी-चपाती, डाळ व भात खाऊ शकता. सोबत हिरवी मिरची खावी. चपाती गहू, बाजरी, नाचणीची खाल्ली तर अधिक उत्तम.
(वाचा :- Weight loss without exercise : पोट-मांड्यांवरचं फॅट होईल कमी, फक्त करा ‘ही’ 8 एकदम फालतू कामं, जिम-डाएटचे पैसेही वाचतील!)
संध्याकाळी काय खावे?

संध्याकाळी तुम्ही एक कप कॉफी किंवा चहा पिऊ शकता. लक्षात ठेवा की चहा आणि कॉफीमध्ये दूध घालणे आवश्यक आहे. यासोबत तुम्ही काही बिस्किटे घेऊ शकता. चहा किंवा कॉफीसोबत खारट पदार्थ खाऊ नयेत. ते तेलापासून बनवलेले असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
(वाचा :- Lata Mangeshkar Death: करोनाशी झुंज देता देता लतादिदींना शेवटच्या क्षणाला ‘या’ आजाराने जखडलं, हा आजार करतो सर्व अवयव खराब..!)
रात्रीच्या जेवणात खा हे पदार्थ

रात्रीचे जेवण कधीच स्किप करू नये. वजन कमी करणारे लोक सहसा असेच करतात. रात्रीच्या जेवणात भाज्यांचा दलिया, भाज्यांंची बनलेली खिचडी, चपाती-भाजी खाऊ शकता. जेवणासोबत नेहमी कच्ची मिरची खावी. रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपण्यापूर्वी अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा धणे पूड आणि अर्धा चमचा मोहरी एक ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता.
(वाचा :- Mucus in lungs : छाती व फुफ्फुसात चिकटलेला कफ ऐन करोना काळात पडू शकतो महागात, ‘हे’ 6 देसी उपाय 2 दिवसांत कफ करतील साफ..!)