सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील आशा ज्ञाते या अभिनेत्रीच्या आईने घेतला अखेरचा श्वास – Bolkya Resha

मालिकेतील नायकनायिकेबरोबरच इतर व्यक्तीरेखा लोकप्रिय होत असतात त्या ती भूमिका साकारणारया कलाकारांमुळे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतही आईवडीलांविना पोरकी असलेल्या पडदय़ावरच्या गौरीला आईची माया देणारी अम्मा तिच्या कर्नाटकी भाषेच्या लहेजा आणि सहजसुंदर अभिनयामुळे घराघरात पोहोचली आहे. रिललाइफमध्ये अम्मा बनून गौरीच्या आयुष्यात आईची भूमिका बजावणारया अभिनेत्री आशा ज्ञाते यांच्या खरया आयुष्यात मातृछत्र हरपले. 8 फेब्रुवारीला आशा ज्ञाते यांच्या आईंचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले. मालिकेतील त्यांच्या सहकारी कलाकारांसह मनोरंजनक्षेत्रातील मित्रपरिवाराने त्यांचे सांत्वन केले. आईच्या जाण्याने माझे मायेचे कवच देवाने घेतलं मात्र तिच्या आठवणींचा कप्पा कायम भरलेला राहिल अशा भावना आशा यांनी व्यक्त केल्या.

actress aasha dnyate
actress aasha dnyate

मूळच्या नाशिकच्या असलेल्या आशा यांनी गेल्या 22 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आपले स्थान मिळवले आहे. वयाच्या 32 व्या वर्षी कामगार कल्याण केंद्राच्या जाणीव या नाटकातून आशा ज्ञाते यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. या नाटकात त्यांनी केलेल्या सासूबाईंच्या भूमिकेला उत्कृष्ट अभिनयाचे पहिले बक्षीस मिळाले होते. मी रेवती देशपांडे, यदाकदाचित, आम्ही पाचपुते, जागो मोहन प्यारे, सौजन्याची ऐशीतैशी, नटसम्राट, लक्ष्य, गोठ, शिवछत्रपती, स्वामी समर्थ, माझिया प्रियाला प्रीत कळेना, अशा नाटक व मालिकांमधून आशा ज्ञाते यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्यांची सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लोकप्रिय तर आहेच पण अस्सल महाराष्ट्रीयन असूनही कर्नाटकी लूक असलेली अम्मा ही भूमिका त्यांनी अभिनयाच्या जोरावर चांगली वठवली आहे. कानडी हेल काढून मराठी बोलणारी ही अम्मा आशा ज्ञाते यांनी घराघरात पोहोचवली आहे. आशा कुठेही गेल्या तर त्यांना अम्मा नावाने महिला हाक मारतात तेव्हा त्यांना या भूमिकेचे चीज झाल्याचा आनंद होतो. खरं तर या मालिकेत नंदिनी शिर्केपाटील हे आईचे पात्र अभिनेत्री वर्षा उसगावकर साकारत आहेत, तर आशा यांची भूमिका ही शिर्केपाटील यांच्या घरातील स्वयंपाकासाठी असलेल्या मदतनीस महिलेची आहे.

हेही वाचा :  एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा
actress aasha dnyate family
actress aasha dnyate family

पण मालिकेची नायिका गौरी ही अनाथ असल्याने तिच्यासाठी ही अम्माच तिच्या आईच्या जागी असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे अम्मा या व्यक्तीरेखेच्या नावाला साजेसी आईची भूमिका करणारया आशा ज्ञाते यांनी ऑनस्क्रिन आईला चांगलाच न्याय दिला आहे. प्रत्यक्ष आयुष्यातही आशा या दोन मुलींच्या आई आहेत, त्यापैकी रेश्मा ज्ञाते ही त्यांच्यासारखीच अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. आशा ज्ञाते यांचा अभिनय प्रवास गेल्या 20 वर्षाहून अधिक काळाचा असला तरी वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी नाटय़शास्त्र विषयात पदवी घेतली. वयाच्या या टप्पावर आवडत्या क्षेत्रातील पदवी घेण्यासाठी त्यांना त्यांच्या आईने खूप प्रोत्साहन दिल्याची आठवणही त्यांनी शेअर केली. शास्त्रीय संगीताचे शिक्षणही आशा यांनी घेतले असून त्यांच्या आजवरच्या करिअरच्या वळणावर आईने त्यांना खूप साथ दिली होती. त्यामुळेच आईच्या निधनाने आयुष्यातील फार मोठा आधार गेल्याने त्या भावूक झाल्या आहेत. आजपर्यंत केलेल्या अनेक मालिका, नाटकांमध्ये मी आईची भूमिका केली आहे, वास्तवात दोन मुलींच्या आईपणाचे अनुभव घेतले आहेत, पण तरीही सत्तर वर्षे मिळालेला आईचा सहवास आता संपला या विचाराने त्या हळव्या झाल्या आहेत.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …