एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा


|| सुशांत मोरे

बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा

मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास करता येणार आह़े  सुलभ प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आह़े

प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी आणि तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा देण्यात येणार आह़े  बेस्ट उपक्रमाने २०२० च्या ऑक्टोबरपासून ‘सामायिक कार्ड’च्या चाचणीला सुरूवात केली.  त्यास लवकरच अंतिम रुप देताना हे कार्ड प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्डद्वारे प्रवाशाला तिकिटाचे पैसे अदा करावे लागतील. त्यासाठी कार्डमध्ये पैसे असणे गरजेचे आहे. हे कार्ड रिचार्ज करता येईल.  देशभरात ज्या बस, मेट्रो आणि अन्य परिवहन सेवांमध्ये ‘सामायिक कार्ड’ची सुविधा आहे, तिथे बेस्टच्या कार्डचाही वापर करता येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितल़े 

या कार्डसाठी एका बँकेशी करार करण्यात येणार आह़े  प्रवासी वाहतुकीत तिकीट काढण्याबरोबरच डेबिट कार्डप्रमाणे या कार्डचा वापर करता येईल. या कार्डद्वारे वीजबिल भरणे, यासह अन्य देयके भरण्याचीही सुविधाही असेल.

हेही वाचा :  SBI Recruitment 2022: विविध पदांसाठी भरती, ६३ हजारांहून अधिक पगार, जाणून घ्या तपशील

रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) एकात्मिक तिकीट प्रणालीची योजना काही वर्षांपूर्वी आखण्यात आली. परंतु, ही योजना अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. त्याआधीच बेस्टकडून या कार्डची सुविधा देण्यात येणार आह़े  मुंबई उपनगरीय लोकलमध्येही तिकीट, पाससाठी ही सेवा आणण्याचा प्रयत्न ‘एमआरव्हीसी’च्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, त्यासही अद्याप मूर्त रुप मिळालेले नाही.

’ या कार्डमुळे प्रवास सुलभ आणि रोख रकमेशिवाय करता येईल़

’ या कार्डचा वापर डेबिट कार्डप्रमाणेही करता येणे शक्य़़ 

’ वीजबिलासह अन्य देयके भरण्याचीही कार्डद्वारे सुविधा.

मुंबईसह देशभरात प्रवासासाठी या कार्डचा वापर करता येईल़  सुलभ प्रवास आणि वेळेची बचत करणारे हे कार्ड फेब्रुवारीअखेपर्यंत प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येईल़    – लोकेश चंद्र, बेस्ट   उपक्रमाचे महाव्यवस्थापक

The post एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास; बेस्ट उपक्रमाकडून फेब्रुवारीअखेर सुविधा appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …