Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले


हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आपत्ती निवारण कक्षातर्फे शुक्रवारी काही मदत क्रमांक जाहीर करण्यात आले होते. या मदत क्रमांकांद्वारे जिल्हयातून आतापर्यंत ३१ पालकांनी त्यांची मुले युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली आहे. जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची माहिती तत्काळ राज्य आपत्ती निवारण कक्षाकडे पाठविण्यात येत असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले आहे.

Russia Ukraine War News Live: युक्रेनची राजधानी किव्हपासून काही अंतरावर रशियन सैनिक; ब्रिटनने दिली माहिती

भारतातून रशिया आणि युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. सध्या या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे युक्रेनमध्ये गेलेल्या विदयार्थ्यांच्या पालकांसाठी मदत क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुरबाड, भिवंडी आणि नवी मुंबई, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, बोरिवली, पडघा, नेरुळ या शहरांतील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेले असल्याची माहिती समोर आली आहे. युद्ध परिस्थितीत मुलं अडकल्याने सरकारने त्यांना लवकरात लवकर सुखरूपरीत्या मायदेशी परत घेऊन यावे अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
पालकांनी येथे संपर्क साधावा.

हेही वाचा :  पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची माहिती देंण्यासाठी ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ या संपर्क क्रमांकावर आणि [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात …