“तुमच्यासारखा निर्दयी शासक…”; पंतप्रधानांच्या आरोपांनंतर ट्विटरवर रात्री दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्ली सरकारमुळे करोना देशभरात पसरल्याचा आरोप केला होता

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी केजरीवाल यांनीही योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले. एकीकडे सुनो केजरीवाल म्हणणाऱ्या मुख्यमंत्री योगींना सुनो योगी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरावरील केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. योगी यांनी ट्विट करत, “आदरणीय पंतप्रधानांबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आजचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी,” असे म्हटले आहे.

या ट्विटनंतर योगींनी आणखी एक ट्विट केले. ‘केजरीवाल ऐका, जेव्हा संपूर्ण मानवता करोनाच्या वेदना सहन करत होती, त्यावेळी तुम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांना दिल्ली सोडण्यास भाग पाडले. तुमच्या सरकारने मध्यरात्री उत्तर प्रदेश सीमेवर लहान मुलांना आणि महिलांनाही असहाय्य सोडण्यासारखे अमानुष कृत्य केले. तुम्हाला मानवविरोधी म्हणावे कि…” असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

हेही वाचा :  ताडदेव इमारतीच्या आगीचे कारण स्पष्ट नाही

“सॉरी सर, जीव धोक्यात घालून लोकांना…”; पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर काँग्रेस आमदाराचे प्रत्युत्तर

तिसऱ्या ट्विटमध्ये योगींनी,”वीज-पाणी कनेक्शन तोडण्यात आले आणि झोपलेल्या लोकांना उचलून बसमधून उत्तर प्रदेश सीमेवर पाठवण्यात आले. आनंद विहारसाठी बसेस जात आहेत, त्यापलीकडे उत्तर प्रदेश-बिहारसाठी बसेस उपलब्ध होतील, अशी घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आणि त्यांना सुखरूप परत आणले. केजरीवाल यांना खोटं बोलण्याची हातोटी आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश करोनासारख्या जागतिक महामारीशी झुंज देत असताना केजरीवाल यांनी स्थलांतरित मजुरांना दिल्लीतून बाहेरचा रस्ता दाखवला,” असे म्हटले आहे.

योगींच्या या ट्विटवर अरविंद केजरीवाल शांत बसले नाहीत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये दिली होती तशीच प्रतिक्रिया केजरीवाल यांनीही दिली. केजरीवाल यांनी ट्विटची सुरुवात सुनो योगींनी केली. केजरीवाल यांनी ट्विट करत, “ऐका योगी, तुम्ही राहू द्या. उत्तर प्रदेशातील लोकांचे मृतदेह नदीत वाहत होते आणि तुम्ही करोडो रुपये खर्च करून टाईम्स मासिकात तुमच्या खोट्या जाहिराती देत ​​होता. तुमच्यासारखा निर्दयी आणि क्रूर शासक मी पाहिला नाही,” म्हटलं आहे.

हेही वाचा :  “विराटनं कर्णधारपद सोडल्यामुळेच BCCI ला निर्णय बदलावा लागला”, माजी क्रिकेटपटू साबा करीम यांचा नवा खुलासा!

दरम्यान, दिल्लीच्या राज्य सरकारने झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले. त्यांच्यासाठी दिल्लीतून बसगाडय़ांची व्यवस्था केली आणि मध्येच कुठेतरी सोडून दिले. त्यामुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांत नसलेला करोना वेगाने पसरत गेला, असा आरोप मोदींनी सोमवारी लोकसभेत  केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …