जिनिलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जिनिलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
जिनिलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जिनिलिया बोलते, ”स्त्रियाच घर चालवतात, दुसरं कुणी नाही. घरच नाही, स्त्रिया नसतील तर उद्या फेसबुक, इन्स्टाग्रामही चालणं बंद होईल.” तर हा व्हिडीओ शेअर करत हे बरोबर आहे ना असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे.
आणखी वाचा : “तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल
Photo : पेडर रोडवरील प्रभाकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी
दरम्यान, फक्त जिनिलिया नाही तर तिचा पती म्हणजेच अभिनेता रितेश देशमुखही सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते दोघेही चाहत्यांच्या संपर्कात राहतात. रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या

