याआधी टेक्नो पोवा ५जी फोन नायजेरियामध्ये लॉंच करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा पहिला सेल १४ फेब्रुवारीला येईल.
स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतात आपला पहिला ५जी स्मार्टफोन लॉंच केला आहे. कंपनीने टेक्नो पोवा ५जी (Tecno Pova 5G) या नावाने हा फोन सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६०००एमएएचची दमदार बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, यात फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि १२०Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. हे मीडियाटेक प्रोसेसर देते. याआधी टेक्नो पोवा ५जी फोन नायजेरियामध्ये लॉंच करण्यात आला होता.
टेक्नो पोवा ५जी स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम या दोन प्रकारात येतो. तसेच यामध्ये अँड्रॉइड हायओएस ८.० देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये ६.९५ इंचाचा एचडी डिस्प्ले असून त्याचे रिझॉल्यूशन १०८०×२४६० पिक्सेल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२०Hz आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्शन ९०० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे.
तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप खराब झालाय? सारखा चार्ज करावा लागत असेल तर जाणून घ्या ‘या’ टिप्स
टेक्नो पोवा ५जी स्मार्टफोनची भारतातील किंमत १९,९९९ रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोनचा पहिला सेल १४ फेब्रुवारीला येईल. जे ग्राहक पहिल्या सेलमध्ये टेक्नो पोवा ५जी खरेदी करतील त्यांना १,९९९ रुपयांची पॉवर बँक मोफत मिळेल, अशी ऑफर कंपनीने दिली आहे
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची प्रायमरी लेन्स ५० मेगापिक्सेल आहे, दुसरी लेन्स १३ मेगापिक्सेलची आहे, तर तिसरी लेन्स २ मेगापिक्सेलची आहे. तसेच १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६०००एमएएचची बॅटरीसोबत १८W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
मोबाईल डेटा संपल्यावरही Whatsapp करणार काम; जाणून घ्या इंटरनेटशिवाय कसा करता येणार वापर
कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये डीटीएस स्पीकर, ब्लूटूथ व्ही५.२, जीपीएस/ए-जीपीएस, वायफाय ८०२.११ बी/जी/एन, यूएसबी टाईप-सी पोर्ट, एफएम रेडिओ आणि ३.६ एमएम हेडफोन जॅक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.