‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”


‘विक्रम वेधा’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सैफचे लाखो चाहते आहेत. सैफ लवकरच अभिनेता हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा या चित्रपटात दिसणार आहे. तर सैफ आणि हृतिक मोठया पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, विक्रम म्हणजेच सैफचा फस्ट लूक हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच सैफसोबत काम करण्याता त्याचा अनुभव त्याने सांगितला आहे. तर करिनाने सैफचा लूक शेअर करत तिला प्रचंड आवडला असे सांगितले आहे.

करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सैफचा हा फोटो शेअर केला आहे. यात सैफने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला असून त्याचा डॅशिंग लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. करीना सैफचा हा लूक शेअर करत, “माझा पती आधी पेक्षा जास्त हॉट आहे. याची प्रतिक्षा करू शकत नाही”, असे कॅप्शन करीनाने दिले आहे.

आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

तर सैफचा हा लूक शेअर करत हृतिक म्हणाला, “एक अप्रतिम कलाकार आणि सहकर्मीसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. ज्या कलाकाराच्या अभिनयाची मी स्तुती करत होतो. एक असा अनुभव येणार जो मला कायम लक्षात राहिल. प्रतिक्षा करू शकत नाही.”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

दरम्यान, विक्रम वेधा हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विक्रम वेधा या चित्रपटाची पटकथा ही विक्रम वेताळ या मायथॉलॉकिल कहानीवरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात सैफ अली खान पोलिस असणार आहे. तर हृतिक रोशन हा गँगस्टर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज
Next बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या डिटेल्स

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …