Tag Archives: career news in marathi

School Holidays: विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा! सप्टेंबरमध्ये ‘इतके’ दिवस शाळांना सुट्टी

Holidays In September 2023: शालेय विद्यार्थी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट याच महिन्यात आहे. एकतर गणपती बाप्पाचे आगमन आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुट्ट्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात सणासुदीनिमित्त शाळेला सुट्ट्या असणार आहेत. रक्षाबंधन, नारणी पोर्णिमा सणाची सुट्टी ऑगस्टच्या शेवटी गेली असली तरी आता सप्टेंबर महिनाही नव्या सुट्ट्यांनी मुलांचे स्वागत करत आहेत. …

Read More »

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Job: नाशिकमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषद भरती अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) – 50, आरोग्य पर्यवेक्षक – 3, आरोग्य परिचारिका – 597, आरोग्य सेवक …

Read More »

शिक्षणात मराठी भाषेचा वापर वाढविणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

Use of Marathi Language: राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी तांत्रिक विषयांचे मराठीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. वरळी येथे आयोजित मराठी विश्व संमेलनात शुभेच्छा देतांना ते बोलत होते.विश्व मराठी संमेलनाच्या भारदस्त आयोजनासाठी मराठी भाषा विभागाचे अभिनंदन करून मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रभावी पाऊले …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी शोध समिती नव्याने

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी स्थापन करण्यात आलेल्या शोध समितीत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) सदस्य नसल्याने, या समितीची नव्याने रचना करावी लागणार आहे. यूजीसीच्या नियमावलीनुसार ही नवी समिती स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत राज्यपाल कार्यालयानेही दुजोरा दिला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. …

Read More »

Maharashtra Scholarship Results: शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर

Scholarship Results: शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमएससीई पुणे कडून शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. पाचवीच्या परीक्षेत २३.९० टक्के विद्यार्थी आणि आठवीच्या परीक्षेत १२.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात वाढ …

Read More »

महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धी उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी‘कोव्हिड काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अध्ययन ऱ्हास झाल्याचे सर्वेक्षणामधून समोर आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखन कौशल्ये विकसित करून अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावृद्धी कार्यक्रम राबविणार आहे,’ अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. ‘निपुण भारत’ योजनेअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून निर्देश देण्यात …

Read More »

Medical Education In Marathi:’मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे कठीण’

औरंगाबाद : एमबीबीएस आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे कठीण असल्याचे चित्र आहे. जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय योग्य आहे आणि …

Read More »

Good News For Students: सरकारी शाळामध्ये मिळणार परकीय भाषांचे धडे

पुणे : जिल्हा परिषद, महापालिकेच्या शाळा, अनुदानित शाळा आणि सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश यांसारख्या परकीय भाषांचे शिक्षण मोफत घेता येणार आहे. पुण्यातील ‘एफएलओए’ या ऑनलाइन शिक्षण सामुग्री तयार करणाऱ्या संस्थेने परकीय भाषांचे ऑनलाइन मोड्युल तयार केले आहे. त्याद्वारे विद्यार्थी घरबसल्या किंवा शाळेतून परकीय भाषांचे प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.एक ते चार अशा स्तरांमध्ये (चार मोड्युल) हा अभ्यासक्रम …

Read More »

परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा

म. टा. प्रतिनिधी, मुंबईपरिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला राज्य सामायिक परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सीईटी कक्षाने केलेले अपिल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल व न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने मंगळवारी फेटाळले. त्यातून आता परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी …

Read More »

युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण

म. टा. प्रतिनिधी, नागपूररशिया-युक्रेनमधील संघर्षामुळे मायदेशी परतलेले विद्यार्थी गेल्या अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण घेताहेत. त्यातही तेथील परिस्थितीनुसार कधी इंटरनेट नसते तर कधी विद्युत पुरवठा नसतो. परिणामत: ऑनलाइन शिक्षणातही अडथळा येत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली. फेब्रुवारीत रशिया-युक्रेनमधील संघर्षाने विघातक स्वरूप धारण केले. युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. त्यामध्ये हजारो भारतीयदेखील होते. भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना …

Read More »

Schools Subsidy: एक निर्णय आणि राज्यातील ६ हजार शाळा, ६३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार फायदा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईराज्यातील शाळांना अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार शाळांना एक हजार १०० कोटी रुपये देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार सहा हजार १० प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना, तसेच १४ हजार ८६२ तुकड्यांना अनुदान मिळणार आहे. याचा लाभ राज्यातील सुमारे ६३ हजार …

Read More »

ठाण्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती

ठाणे : ग्रामीण भागातील शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच कमी पटसंख्यांच्या शाळा टिकविण्यासाठी लढा सुरू असतानाच २०२१-२२ मध्ये पाचवीमधील विद्यार्थ्यांची अडीच टक्क्यांनी तर आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल साडेतीन टक्क्यांनी गळती झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक गळतीचे प्रमाण अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी परिसरातील असून शहापूरमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत भर पडलेली आहे. तर मुलांच्या तुलनेत मुलींच्या गळतीचे प्रमाण अधिक असल्याचेही …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष वगळता अन्य वर्षांच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु, आठवडाभरापूर्वी फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आमच्या परीक्षेचे काय?, असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. फार्मसीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या थेट …

Read More »

MBBS च्या वर्गात शिकायचा बारावीचा विद्यार्थी, कॉलेजलाही थांगपत्ता नव्हता पण…

HSC student studying in MBBS class: आपल्या वयापेक्षा मोठ्या इयत्तेच्या वर्गात जाऊन शिक्षण घेणाऱ्या रॅंचोची कहाणी आपण थ्री इडियट सिनेमातून ऐकली असेल. पण चुकीच्या गोष्टीसाठी असे प्रकार करणारे ‘रॅंचो’ची संख्या देखील कमी नाही. केरळच्या कोझिकोड मेडिकल कॉलेजमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे बारावीचा एका विद्यार्थ्याने वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. पण हे प्रकरण भलतेच असल्याचे सर्वांच्या लक्षात आल्याने …

Read More »

मुंबई विद्यापीठाकडून पुनर्मूल्यांकनाच्या निकालापूर्वीच फेरपरीक्षेचा घाट

म. टा. प्रतिनिधी मुंबई मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या एलएलएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल लागण्यापूर्वीच विद्यापीठाने परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदतही गुरुवारी संपली. त्यामुळे पुर्नमुल्यांकनाच्या निकालाची वाट पाहायची की पुर्नपरीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा मे २०२२ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी …

Read More »

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या गट ‘ब’, गट ‘क’ व गट ‘ड’ पदभरती परीक्षांमध्ये डमी उमेदवार बसल्याचा संशय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. विद्यापीठाने या परीक्षेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या संघटनेमार्फत करण्यात आली आहे. विद्यापीठामार्फत १४० पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा जवळपास १४ हजार उमेदवारांनी दिली होती. ३ …

Read More »

खुशखबर! जगभरात मंदीचे सावट पण भारतीय कंपन्यांमध्ये मेगाभरती

वृत्तसंस्था, नवी दिल्लीजगभरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा पवित्रा घेतलेला असताना भारतीय कंपन्यांनी मात्र, कर्मचारी भरतीवर भर दिला आहे. हायरिंग एजन्सी ‘जॉबस्पीक’च्या अहवालानुसार, यंदा नोव्हेंबरमध्ये कर्मचारी भरतीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी आणि ऑक्टोबरच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढले आहे. देशातील बहुसंख्या कंपन्या सणासुदीनंतर नोव्हेंबरमध्ये कर्मचारी भरती करीत नाहीत. मात्र, यंदा हा कल मागे पडला आहे. चालू …

Read More »

‘तो’ निर्णय रद्द न केल्यास शिक्षक करणार आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडखासगी विनाअनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतून अनुदानित शाळा-कनिष्ठ महाविद्यालय किंवा तुकडीवर बदली करण्यासंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील शासन निर्णयास स्थगिती देण्याच्या विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटनांची झोप उडाली आहे. या निर्णयाला राज्यभरातून शिक्षक संघटनांनी मोठा विरोध दर्शविला असून, नाशिकमध्येही मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवावी, या मागणीचे निवेदन राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब …

Read More »

शाळा, कॉलेजांमध्ये मतदार साक्षरता मंडळ

म. टा. प्रतिनिधी,पुणेकॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांमध्ये मतदान प्रक्रियेची जनजागृती करण्यासाठी आता पुणे शहर आणि जिल्ह्यात प्रथमच मतदार साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात पहिला प्रयोग करण्यात येत असून, मोहिमेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्रासह क्रेडिट पॉइंटही मिळणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील ४३ कॉलेजांसह १५ शाळांमध्ये मतदार साक्षरता मंडळ स्थापन होणार आहे. ९० विद्यार्थ्यांची …

Read More »

‘स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शाळाप्रवेश थांबणार नाहीत’

School admissions : ‘शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत’, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी दिली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.‘राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक वा माध्यमिक शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल, अशा विद्यार्थ्याला आता सुलभ प्रवेश …

Read More »