Tag Archives: mumbai news

Weather News : मुंबईत उन्हाचा लपंडाव; विदर्भ- मराठवाड्यासाठी मात्र हवामानाचा चिंता वाढवणारा अंदाज

Maharashatra Weather News : राज्यात सध्या हवामानाच्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती पाहायला मिळत आहे. तिथं कोकण किनारपट्टी भागांमध्ये तापमानात वाढ होऊन उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच इथं मराठवाडा आणि विदर्भाला मात्र गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यापासून नजीकच्या भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, तामिळनाडूच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळं राज्यात पावसाळी वातावरण तयार …

Read More »

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यात एका कंपनीच्या HR नं लिंक्डइनवर केलेल्या एका पोस्टमुळे वाद सुरु झाला आहे. ही HR गुजरातची एक फ्रीलांस रिक्रुटर आहे. ती सध्या मुंबईतील एका कंपनीसाठी असलेल्या एका ग्राफिक डिझायनरच्या रिक्त पदासाठी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. पण हे सगळं सांगत असताना तिनं अशी एक गोष्ट …

Read More »

Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेचा यलो अलर्ट

Maharashtra Weather News : देश पातळीवर सध्या हवामानात असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या हिमवृष्टीचा थेट परिणाम देशातील मैदानी क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. पण, ही घट समाधानकारक नसेल ही वस्तूस्थिती. पूर्वोत्तर भारतात मात्र पावसाची …

Read More »

Weather News : उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’; कोकणासह राज्याच्या ‘या’ भागात हवामानाची विचित्र स्थिती

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह अधिक वाढत असतानाच काही भागांना मात्र अवकाळी पावसाचा मारा सोसावा लागत आहे. इथं मान्सूनची प्रतीक्षाही शिगेला पोहोचली आहे. एकंदर राज्यातील हवामानाची स्थिती सातत्यानं बदलत असून, येणारा काळ उष्मा वाढवणारा असेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  पुढील 24 तासांसाठी राज्याच्या उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र भागामध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा असून, मराठवाडा …

Read More »

Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; ‘इथं’ मात्र अवकाळीचं संकट

Maharashtra Weather News : अवकाळीचं सावट राज्यातून माघार घेताना दिसत असतानाच आता उन्हाचा तडाखा दुपटीनं वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागांमध्ये हवामानाचं रौद्र रुप संकटांमध्ये भर टाकताना दिसत आहे. तर, कोकणातील बहुतांश भागाला उष्णतेच्या धर्तीवर यलो अलर्ट देण्याचत आला आहे. कोकणात पुढील 24 तासांसाठी हवामान दमट राहणार असून, त्यामुळं उष्णतेचा दाह अधिक भासणार आहे. तर, उर्वरित राज्यात तापमानात लक्षणीय …

Read More »

महारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

MAHARERA: बिल्डिंगमध्ये अपुऱ्या जागेच्या अभावी पार्किंग करण्यास अडचणी येतात. हल्ली काही बिल्डर घर खरेदी केल्यानंतरच सोबतच पार्किंगही विकत घेतात. मात्र तरीही पार्किंगवरुन होणारे वाद कायम आहेत. या वाद-विवादावर  महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा)ने मोठे पाऊल उचलले आहे. य बिल्डरने यापुढे करारनाम्यात पार्किंगबाबत संपूर्ण तपशील देणे बंधनकारक आसणार आहे. महारेराने अलीकडेच हे नियम बंधनकारक केले आहेत. पार्किंग स्पेसची विक्री करत असतानाच …

Read More »

होरपळ! आठवड्याच्या शेवटी उन्हाचीच बॅटिंग; सुट्ट्यांच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा विचारही नकोच

Maharashtra Weather News : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अकाळी पावसाचा मारा केल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर, काही ठिकाणी शेतपिकं आणि फळबागांचंही नुकसान झालं आहे. एकिकडे अवकाळी संकटं वाढत असतानाच दुसरीकडे मात्र गारपीटीचाही मारा सुरुच आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाची हीच स्थिती पाहायला मिळणार असून, त्यात फारसे बदल अपेक्षित नाहीत. त्यामुळं …

Read More »

सख्खे-भाऊ बहीण कारमध्ये खेळत होते, अन् अचानक…; चिमुरड्यांचा गुदमरुन मृत्यू

Mumbai News Today: अँटोप हिल परिसरात दोघा चिमुकल्यांचा कारमध्ये अकडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खेळता खेळता गाडीत अडकून गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  साजिद मोहम्मद शेख, ७ आणि रीना, ५ या दोघा सख्ख्या बहीण भावांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही दुपारपासून …

Read More »

Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Railway Terminals News in Marathi: रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी अन् लोकलवर येणारा ताण, याचा विचार करता मध्य रेल्वेकडून नेहमी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान मध्य रेल्वेवर चार नवे टर्मिनस उभारणारचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई आणि परिसरात सहा ठिकाणांची चाचपणी सुरू झाली आहे. यामध्ये पनवेल, कल्याण, कळंबोली, डोंबिवली, ठाणे आणि परळ या ठिकाणी मेगा टर्मिनस उभारता येईल का, याची विचार …

Read More »

घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather News : (Mumbai, Konkan) मुंबई आणि कोकणात पुढील 48 तासांमध्ये उकाडा आणखी तीव्र होणार असून, उष्णतेची लाट काही अडचणी निर्माण करताना दिसणार आहे. शहरातील काही भागांमध्ये सूर्याचा प्रकोप अंगाची काहिली करताना दिसेल, तर कोकण किनारपट्टी भागात मूळ तापमानाहून अधिक दाह जाणवेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तिथं विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट कायम …

Read More »

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यश

Vasai Fort Leopard: वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यास अखेर वनविभागाला यश आले आहे. अखेर 25 दिवसांनंतर वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. त्यामुळं भीतीच्या छायेत वावरणाऱ्या वसईकरांनी व ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.  25 दिवसांपूर्वी वसई किल्ल्या परिसरात बिबट्या दिसला होता. त्यामुळं परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही व ट्रॅप बसवले होते. मात्र, …

Read More »

Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Electricity Price Hike News In Marathi: राज्यात सध्या उन्हाळ्याचे चटके बसत आहेत. अनेक ठिकाणी तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढून अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात घरातील एसी, पंखा, फ्रीज यांसारख्या वस्तूंचा वापर वाढू लागला आहे. अशापरिस्थितीत अदानी वीज कंपनीची  वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख …

Read More »

तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा

Andheri Gokhale Pool :  अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची …

Read More »

महाराष्ट्रातील ‘त्या’ 18 जातींचा सर्वंकष अहवाल सादर करा; मागासवर्गीय आयोगाचा अल्टीमेटम

Mumbai News : महाराष्ट्र राज्यातील 18 जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी राज्यशासनाने पाठविलेल्या प्रस्तावावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे 1 मार्च रोजी आढावा बैठक घेवून या प्रस्तावावर समिक्षा केली. त्यावेळी त्यांनी 18 जातींच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीविषयी येत्या 7 दिवसात आयोगास नव्याने अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले …

Read More »

मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

mumbai local mega block : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी २ मार्च रोजी कल्याण – कसारा विभागातील अप आणि डाउन ईशान्य मार्गांचा समावेश करून एकात्मिक विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण-कसारा विभागात अप आणि डाउन ईशान्य मार्गांवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक  रोड क्रेन वापरून खडवली आणि …

Read More »

शनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?

Local Train Update : देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : मध्य रेल्वेचा रात्रकालीन मेगा ब्लॉक आज म्हणजे शनिवारी 24 फेब्रुवारी ते रविवारी 25 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उपनगरीय भागांवर रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत, अप जलद मार्गावरील सेवा त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार मुलुंड स्थानकावरुन अप धीम्या मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान वळवण्यात येतील आणि माटुंगा …

Read More »

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा  देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे.  मुंबईतील 58  बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत …

Read More »

वसई-भाईंदर प्रवासात होणार 55 मिनिटांची बचत, लवकरच रो-रो सेवेचं उद्घाटन

Vasai Virar News in Marathi : गेल्या काही वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर रोड, मीरा-भाईंदर, वसई-विरार किंवा सर्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गांवरच अवजड वाहतूकीची संख्या देखील वाढत चालली आहे. या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते, अंतर्गत मार्गिक कमी पडू लागल्या आहेत. मात्र आता वसईकरांची दगदग लवकरच …

Read More »

‘शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ…’; ठाकरेंचा हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Shoot Dead: “गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात असुरक्षित राज्य बनले आहे. रोज कोठे ना कोठे हत्या होत आहेत व राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री ‘शेमलेस’ पद्धतीने यातील गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंडांचे राष्ट्र झाले की काय? असे वाटू लागले आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरे गटाने अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूनंतरच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून हल्लाबोल करताना म्हटलं आहे. “अभिषेक …

Read More »

8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, ‘CM आणि बाळाराजांकडून..’

Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: शिवसेनेमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र असलेल्या अभिषेक यांच्यावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाईने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट …

Read More »