Tag Archives: Team India

सौरव गांगुली CM ममता बॅनर्जी यांच्याबरोबर परदेश दौऱ्यावर, नव्या इनिंगची केली घोषणा

Sourav Ganguly : भारतीय क्रिकेट संघाचे (Team India) माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) क्रिकेटनंतर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.  सौरव गांगुली सध्या स्पेनमध्ये (Spain)असून माद्रीदमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली. सौरव गांगुली यांच्याबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील परदेश दौऱ्यावर आहेत.  नव्या इनिंगला सुरुवातक्रिकेटनंतर सौरव गांगुली उद्योग क्षेत्रात पाऊल टाकतायत. पश्चिम बंगालमधल्या पश्चिम …

Read More »

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भारतीय संघ या सामन्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच नवीन खेळाडूंना संधी देणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी केएस भरतला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते. भरत देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत …

Read More »

‘बस IPL राहिल आणि…’; फ्रँचायझी क्रिकेटवर सौरव गांगुली यांचं मोठं वक्तव्य

Sourav Ganguly on Francise League: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा (International Cricket) टी-20 लीगला (T20 League) खेळाडूंकडून दिली जात असलेली पसंती टिकाऊ नाही, कारण भविष्यात केवळ काही आर्थिकदृष्ट्या मजबूत लीग चालवण्यास सक्षम असतील, असं म्हणत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Former Indian Captain Sourav Ganguly) यांनी फ्रेंचायझी क्रिकेटवर (Franchise Cricket) मोठं वक्तव्य केलं आहे. क्रीडा विश्वात गांगुली यांचं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत …

Read More »

R Ashwin ऑस्ट्रेलियाविरुद्ध करु शकतो खास रेकॉर्ड, दिग्गज फिरकीपटू हरभजनला मागे टाकण्याची संधी 

IND vs AUS, Test : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर. अश्विन (R Ashwin) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत (IND vs AUS Test Series) आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवू शकतो. या मालिकेत केवळ 7 विकेट्स घेऊन तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज बनू शकतो. सध्या ही जागा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहच्या ताब्यात …

Read More »

IND vs AUS: स्टीव्ह स्मिथ मोडणार सचिन तेंडुलकरचा हा खास विक्रम? पाहा आकडेवारी

IND vs AUS, Test Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 39 सामन्यांच्या 74 डावांमध्ये एकूण 11 शतकं झळकावली आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्टीव्ह स्मिथ, रिकी पाँटिंग आणि सुनील गावस्कर हे आहेत. या तिन्ही खेळाडूंनी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात 8-8 शतकं झळकावली आहेत. दरम्यान गावस्कर …

Read More »

Rishabh Pant : भारताला ऋषभ पंतची उणीव भासेल, ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी खेळाडूचा दावा

Rishabh Pant : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला खूप दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो बराच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असून पुढील वर्षभर देखील मैदानात परतण्याची शक्यता कमी आहे. त्यात आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची (IND vs AUS Test) बॉर्डर-गावस्कर मालिका खेळणार आहे. या मालिकेतील …

Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत रंगणार स्मिथ विरुद्ध अश्विन युद्ध, जाणून घ्या खास आकडेवारी 

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या महत्त्वाच्या कसोटी मालिकेचे सामने 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात पोहोचला आहे. दरम्यान भारतीय खेळपट्ट्यांचा विचार करता फिरकीपटूंचा दबदबा दिसून येतो. त्यात या महत्त्वाच्या मालिकेत अनेक फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये मोठी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve smith) …

Read More »

ऑस्ट्रेलिया मालिका 2-1 ने जिंकेल, अनुभवी माजी कर्णधाराची मालिका सुरू होण्यापूर्वी भविष्यवाणी

IND vs AUS, Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यास काही काळ शिल्लक आहे. गुरुवारपासून (9 फेब्रुवारी) या मालिकेतील पहिला सामना सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) या कसोटी मालिकेतील निकालाचा अंदाज वर्तवला आहे. या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 2-1 असा विजय मिळवेल अशी भविष्यवाणी …

Read More »

‘रोहित ब्रिगेड’चा कसून सराव सुरु, 10 फिरकीपटूंना घेऊन सुरु आहे प्रॅक्टिस 

India vs Australia 1st Test Match Nagpur : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरू आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया सराव करत मैदानात घाम गाळत आहे. विशेष गोष्ट म्हणजे संघाच्या कॅम्पमध्ये एकूण 10 फिरकीपटू आहेत. जे खेळाडूंची प्रॅक्टिस घेत …

Read More »

VIDEO : टीम इंडियात पुनरागमनासाठी जाडेजा तयार,जर्सी पाहून भावनिक, म्हणाला…

IND vs AUS, 1st Test : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टीम इंडियात (Team India) पुनरागमनासाठी फारच उत्सुक दिसत आहे. 9 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी जाडेजा भारतीय संघाचा भाग आहे. सध्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. ज्यात जाडेजा असून तो अंतिम 11 मध्येही असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. …

Read More »

मी आधी धोनीसाठी खेळलो, त्यानंतर देशासाठी; टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचं भावनिक वक्तव्य

Suresh Raina on MS Dhoni: 15 ऑगस्ट 2020 चा दिवस कोणताही भारतीय क्रिकेट चाहता कधीही विसरू शकत नाही. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यापाठोपाठच त्याच दिवशी टीम इंडियाचा ऑलराउंडर सुरेश रैनानंही (Suresh Raina) आपल्या निवृत्तीची घोषणा केली.  त्यावेळी सुरेश रैना 33 वर्षांचा होता. …

Read More »

महत्त्वाच्या सामन्यात भारत दक्षिण आफ्रिकेकडून 5 विकेट्सने पराभूत, मालिकाही गमावली

Women’s T20I Tri-Series in South Africa 2023 : भारतीय महिला संघाला (Womens Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यात 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे हा सामना भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात खेळवल्या गेलेल्या T20 त्रिकोणी मालिकेतील फायनलचा सामना होता. त्यात भारत पराभूत झाल्यामुळे मालिका दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. सामन्यात आधी फलंदाजी …

Read More »

‘हे’ 5 स्टार भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

<p style="text-align: justify;"><strong>Team India :</strong>शुभमन गिल, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव <a href="https://marathi.abplive.com/news/sports">या खेळाडूंनी</a> मागील वर्षभरात आपली छाप सोडली. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले. यंदा या खेळाडूंवर नजर असेल. त्याचबरोबर यातील अनेक भारतीय खेळाडू (Team india Players) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतात. वास्तविक, या यादीत अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. आज आपण अशा पाच भारतीय खेळाडूंबद्दल पाहणार आहोत …

Read More »

INDW vs SAW Final : टीम इंडियाचा डाव आटोपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 110 धावाचं आव्हान

Women’s T20I Tri-Series in South Africa 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) महिला संघात सुरु टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 109 धावा केल्या आहेत. ज्यामुळे आता विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघाला 20 षटकांत 110 धावा करायच्या आहेत. भारताकडून हरलीन देवोल हिने (Harleen Deol) 46 धावांची एकहाती झुंज दिली इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने …

Read More »

INDW vs SAW : टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पाहा प्लेईंग 11

Women’s T20I Tri-Series in South Africa 2023 : भारताच्या अंडर 19 महिला संघाने (U19 Team india) विश्वचषक जिंकल्यावर आता वरिष्ठ महिला क्रिकेटसंघही एक महत्त्वाची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ? …

Read More »

श्रेयस अय्यर नागपूर कसोटी सामन्यातून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता

IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यात आता कसोटी मालिका सुरु होणार आहे. नागपुरात सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. फलंदाज श्रेयस अय्यर अनफिट असल्यामुळे पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केलं पण पाठीच्या त्रासामुळे त्याला …

Read More »

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी रवींद्र जाडेजा फिट

IND vs AUS, 1st Test : रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तो भारतीय संघात सामील होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीने बुधवारी (1 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांपूर्वी जाडेजाचा फिटनेस रिपोर्ट जारी केला, ज्यात त्याने फिटनेस टेस्ट पास केल्याने, त्याला नागपूरमध्ये उर्वरित संघात सामील …

Read More »

पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये जागाच नाही; चाहते नाराज

Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. सामना भारतानं 168 धावांनी जिंकत मालिकाही जिंकली, पण यानंतर ही युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे फॅन्स मात्र नाराज झाले होते. कारण बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन होऊन देखील पृथ्वीला प्लेईंग 11 मध्ये अखेरपर्यंत संधी मिळाली नव्हती. ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी दिसून येत होती. सोशल …

Read More »

ICC क्रमवारीत सूर्यादादाचाच बोलबाला; इतिहास रचण्यापासून फक्त काही पावलं दूर

ICC men’s T20I Rankings, Suryakumar Yadav: भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा ICC T20 इंटरनॅशनल क्रमवारीत  (ICC T20I Rankings) अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत, सूर्यानं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय. मात्र, त्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली आहे. न्यूझीलंड विरुद्ध T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात, सूर्यकुमार यादवनं 47 धावांची खेळी खेळून आपल्या क्रमवारीत …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीपूर्वी विराट पोहोचला ऋषीकेशला, पत्नी अनुष्कासोबत घेतलं दर्शन

Virat Kohli and Anushka Sharma : भारतीय क्रिकेटपटू (Team india) सध्या विविध मंदिरात जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर असे युवा खेळाडू आधी पद्मनाभस्वामी मंदिरात त्यानंतर बाबा महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. नुकतंच माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) याचा झारखंडच्या प्रसिद्ध माँ देवरी मंदिरातील (Dewri Maa Temple) दर्शन घेतानाचा व्हिडीओ …

Read More »