टीम इंडियाचं कुठे चुकलं? सामन्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं दिलं हे स्पष्टीकरण

मोहाली, 20 सप्टेंबर: हार्दिक पंड्या, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादवनं मोहाली टी20त भारतीय बॉलर्ससाठी बऱ्याच गोष्टी सोप्या करुन ठेवल्या होत्या. 209 धावांचं आव्हान टी20 क्रिकेटमध्ये फार मोठं मानलं जातं. त्यात मायदेशातल्या खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव असलेल्या भारतीय बॉलर्सना ऑस्ट्रेलियन बॅट्समनवर वर्चस्व गाजवण्याची संधी होती. पण प्रत्यक्षात होम कन्डिशन्सचा फायदा घेण्याची संधी ऑस्ट्रेलियानं भारतीय बॉलर्सना दिलीच नाही. आणि 19.2 ओव्हर्समध्येच कांगारुंनी 4 विकेट्स राखून मोहालीची पहिली लढाई जिंकली. सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माच्या चेहऱ्यावर मात्र पराभवाची निराशा स्पष्ट दिसत होती.

बॅट्समननी कमावलं, बॉलर्सनी गमावलं

मोहालीत याआधीच्या तिन्ही मॅचमध्ये भारतानं दुसऱ्यांदा बॅटिंग करुन जिंकले होते. पण आज टॉस हरल्यानं भारताला आधी बॅटिंग करावी लागली. पण असं असतानाही हार्दिक, राहुल आणि सूर्यकुमारनं टीम इंडियाला धावांचा भला मोठा डोंगर उभारुन दिला. भारतानं 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 208 रन्स स्कोअर बोर्डवर लावले. पण त्यानंतर अक्षर पटेलचा अपवाद वगळता भारतीय बॉलिंग निष्प्रभ ठरली. अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर तीन वर्षानंतर टी20 सामना खेळणाऱ्या उमेश यादवनं 27 धावात 2 विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार या सामन्यात प्रचंड महागडा बॉलर ठरला. त्यानं 4 ओव्हरमध्ये तब्बल 52 धावा दिल्या.

‘बॉलिंगकडे लक्ष देण्याची गरज…’

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं भारतीय फलंदाजांचं तोंडभरुन कौतुक केलं. पण टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटवर लक्ष देण्याची गरज असल्याचं रोहितनं म्हटलं. 209 हा चांगला स्कोर होता. पण आमच्या बॉलर्सनी आज चांगली कामगिरी केली नाही असं रोहितनं सामना संपल्यानंतर म्हटलं.

दरम्यान मोहाली टी20 जिंकून ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतले आणखी दोन सामने बाकी असून 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये तर 25 सप्टेंबरला हैदराबादला तिसरा टी20 सामना पार पडेल.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

IND vs ENG : दे दणादण… सामना एक विक्रम अनेक, भारतीय खेळाडूंचा इंग्लंडवर सर्जिकल स्ट्राइक

कँटबरी : भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आजच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाची चांगलीच धुलाई केली. …

भारताच्या हातून सामना कसा निसटला, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या मॅथ्यू वेडने सांगितलं रहस्य

मोहाली : भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०८ धावा केल्या, पण तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा …