VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे. एका मराठी मुलगीचा हा व्हिडीओ आहे. नाकात नथ, नववारी साडी नेसलेल्या या महाराष्ट्राच्या लेकीने अख्ख्या देशाला वेड लावलं आहे. तिने तिच्या तालावर सर्वांना नाचवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगात संचारल्याशिवाय राहणार नाही.

आता नववारी साडी नेसून असं या मुलीने केलं तरी काय, हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तिने डान्स केला असावा किंवा एखादा स्टंट केला असावा अशी काहीशी तुम्ही कल्पनाही कराल. पण तुमच्या कल्पनेच्या पलिकडे तिने काही करून दाखवलं आहे. तिने चक्क रॅप केलं आहे. तोसुद्धा ‘नववारी’चा

एखादं मराठी गाणं, लावणी यात तुम्हाला नववारीचा उल्लेख ऐकायला मिळाला असेल. नववारीतील ठसकेबाज लावणी तुम्ही पाहिली आहे. पण हीच नववारी नेसून नववारीचा रॅप तुम्ही कधी ऐकला का? हाच रॅप गायला आहे, तो या मराठी मुलीने. नाकात नथ आणि नववारी नेसून तिने नववारीचा रॅप गायला आहे. तिच्या या रॅपने सर्वांना नाचवलं आहे. या रॅपची ही झलक तुम्हीही पाहा.

काय मग मराठी मुलीचा हा रॅप ऐकून तुमचंही अंग थिरकलं की नाही… अंगात अक्षरशः संचारल्यासारखंच झालं असेल… अख्ख्या देशाला या रॅपने वेड लावणाऱ्या, आपल्या तालावर नाचवणाऱ्या या तरुणीचं नाव आहे आर्या जाधव. आर्या ही रॅप गायक आहे. ती अमरावतीची आहे.

आर्या हसल 2.0 या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक आहे. हा शो रॅप गायकांसाठी आहे. या शोमध्येच तिने हा रॅप गायला. हा रॅप गायल्यानंतर परीक्षक तिचं भरभरून कौतुक करताना दिसत आहे. अमरावतीची एक मुलगी 10 जणांवर भारी अशी स्तुती तिची परीक्षकांनी केली आहे.

हा रॅप ऐकताना तुम्हाला नेमकं काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …

आधी आलिशान कार आणि आता गोव्यात घर; कमी वयात तेजस्वीच्या कमाईची होतेय चर्चा

मुंबई, 21  सप्टेंबर : तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री सध्या जिकडेतिकडे गाजत आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीने …