राखी सावंतच्या रोमँटिक सीनवरून भडकला आदिल, मारामारीपर्यंत गेलं प्रकरण

मुंबई :राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांची लव्हस्टोरी तर जगजाहीर आहे. त्याचे रोज नवे किस्से समोर येत असतात. राखी आणि आदिलचा मिळून एक म्युझिक अल्बमही रिलीज झाला आहे. त्यावेळच्या शूटिंगचा किस्सा राखीनं सांगितला.

आदिल आहे पझेसिव्ह
राखीच्या आयुष्यात आदिल आल्यावर तिचं आयुष्यच बदललं आहे. राखीनं काय ड्रेस घालायचा हे आदिलच ठरवतो. तिनं तोकडे कपडे घालू नये, असं त्याचं म्हणणं आहे. राखीकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहू नये, याची काळजी तो घेतो. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीनं म्युझिक अल्बमच्या गाण्याच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पुन्हा एकत्र, दोघांमधील केमेस्ट्री पाहून चाहते फिदा

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, ‘तू मेरे दिल मे रहने लायक नही या गाण्याचं शूट सुरू होतं. राखी आणि गाण्यातला व्हिलन यांचा रोमँटिक सीन होता. आदिलला याची अजिबात कल्पना नव्हती. या सीनमध्ये राखी आणि व्हिलनचा रोमान्स पाहून हिरो दु:खी होतो आणि निघून जातो, असं आहे. ठरल्याप्रमाणे सीन सुरू झाला.’

सीन पाहून आदिल संतापला
राखी सांगते, ‘शूटिंग सुरू झालं. माझा आणि व्हिलनचा रोमान्स सुरू झाला. आदिल तिथेच होता. त्याला हे पाहून धक्का बसला आणि रागही आला. त्यानं लगेच पुढे येऊन व्हिलनशी मारामारी सुरू केली. त्यावेळी राज सरांनी आदिलला शांत केलं.’

सलमानच्या कार वेगचा किती? पळून जाऊ लागला तर? आखलेला हत्येचा प्लॅन

‘तू मेरे दिल मे रहने लायक नही’ हे गाणं रिलीजही झालं. त्यात राखी आणि आदिलची केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे. आदिल अभिनय करू शकतो, हेही अनेकांना कळलं. या व्हिडिओला ८ मिलियन्सहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

कंगना आहे विकी कौशलची फॅन!; ‘इमर्जन्सी’च्या सेटवर रिक्रिएट केला प्रसिद्ध डायलॉग

मुंबई, 15 सप्टेंबर : विकी कौशल स्टारर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ रिलीज होऊन जवळपास तीन …

Video : आनंदाच्या पालखीचा मी भोई, भाऊजींनी साजरी केली ‘होम मिनिस्टर’ची १८ वर्ष!

मुंबई : अगदी घराघरात पोहोचलेला कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. अनेक घरात भाऊजींची वाट पाहिली जाते. …