विम्बल्डनचा राजा, अशी बिरुदावली रॉजर नेहमीच मिरवत होता. पण आता आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने जाहीर केला आहे. फेडरर आता आपला अखेरचा सामना लेव्हर कपमध्ये खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २५ सप्टेंबर या काळात खेळवण्यात येणार आहे. २० वेळा ग्रँड स्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररने या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बऱ्याच दिवसांपासून गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता आणि शस्त्रक्रियेनंतर तो पुनरागमन करू शकला नाही. ४१ वर्षीय महान खेळाडूने निवृत्ती जाहीर केल्यानंतर टेनिसचे एक युग संपत असल्याचे मानले जात आहे.
फेडररने आपल्या खेळाने अनेक सुवर्ण क्षण संपूर्ण जगाला दाखवले आहेत. त्यांनी एक निवेदन सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, यामध्ये फेडररने सांगितले की, “मी ४१ वर्षांचा आहे. मी २४ वर्षात १५०० हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिस माझ्याशी इतक्या उदारतेने वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते आणि आता मला हे ओळखावे लागेल की माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे.”
पुढच्या आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कप टेनिस स्पर्धेला सुरुवात होणार आहे. फेडरर कारकिर्दीतील या शेवटच्या एटीपी स्पर्धेत सहभागी होणार आहे. २४ वर्षांच्या या कारकिर्दीत फेडररने आपल्या प्रतिस्पर्धी आणि जगभरातील चाहत्यांचे आभार मानले. फेडररची ही निवृत्ती अनपेक्षित होती. कारण फेडरर अजून १-२ वर्षे खेळेल, असे वाटले होते. पण फेडररने हा निवृत्ता निर्णय जाहीर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे आता फेडरर सप्टेंबर महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळताना दिसणार नाही. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड होणार आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या