टेनिसचा बादशाह निवृत्ती; पाहा रॉजर फेडरर कधी, केव्हा आणि कुठे खेळणार अखेरची मॅच

लंडन: जागतिक टेनिसमधील एकेकाळचा अव्वल खेळाडू आणि २० ग्रँड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा पहिला पुरुष खेळाडू रॉजर फेडररने निवृत्ती जाहीर केली आहे. ४१ वर्षीय फेडररने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली.

पुरुषांच्या एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतपद मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुरुषांच्या एकेरीत २० ग्रँड स्लॅम जिंकणारा तो पहिला खेळाडू होता. आता या यादीत राफेर नडाल अव्वल स्थानी असून त्याने २२ विजेतेपद मिळवली आहेत, तर नोवाक जोकोव्हिच २१ विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वाचा- रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना

कधी खेळणार अखेरची स्पर्धा?

२०२१ साली जून महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत फेडरर चौथ्या फेरीत पोहोचला होता. त्यानंतर त्याने स्पर्धेतून माघार घेतली. विंबल्डन स्पर्धेसाठी त्याने हा निर्णय घेतला होता. क्वॉर्टर फायनलमध्ये त्याचा सरळ सेटमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर तो कोर्टवर दिसला नव्हता.

वाचा- BCCIमधून गांगुलीचा पत्ता कट होणार; या व्यक्तीला अध्यक्ष करण्याची जोरदार तयारी

आता निवृत्तीची घोषणा केल्यानंतर फेडरर पुढील आठवड्यापासून होणाऱ्या लेवर कपमध्ये अखेरचा कोर्टवर दिसेल. फेडररची ही अखेरची एटीपी स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा २३ सप्टेंबर २०२२ ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात होणार आहे.

फेडररची ग्रॅड स्लॅम विजेतेपद

ऑस्ट्रेलिया ओपन- २००४,२००६,२००७,२०१०, २०१७, २०१८
फ्रेंच ओपन- २००९
विंब्लडन- २००३,२००४,२००५,२००६,२००७,२००९,२०१२,२०१७
अमेरिकन ओपन-२००४,२००५,२००६,२००७,२००८

फेडररने विंब्लडनची ८, ऑस्ट्रेलियन ओपनची ६, अमेरिकने ओपनची ५ तर क्ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच ओपनचे १ विजेतेपद मिळवले आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टेनिस विश्वाला मोठा धक्का… रॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना

नवी दिल्ली : टेनिस विश्वाचा राजा समजला जाणारा रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आता …

सौरव गांगुलीकडे लवकरच मोठी जबाबदारी? ICC अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीचं नाव?

मुंबई, 25 सप्टेंबर: काल सुप्रीम कोर्टानं ग्रीन सिग्नल दिल्यानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव …