BOI Recruitment: आठवी, दहावी ते ग्रॅज्युएट सर्वांना बॅंकेत नोकरीची संधी; ‘येथे’ पाठवा अर्ज

BOI Recruitment: आठवी, दहावी ते ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांना बॅंकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. बँक ऑफ इंडिया (Bank Of India Job) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर विभागीय कार्यालयात ही भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

बॅंक ऑफ इंडियाच्या सोलापूर ब्रांचमध्ये प्राध्यापक (Faculty), ऑफिस असिस्टंट (Office Assistant), अटेंडंट (Attendant), वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) चे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहेत.

प्राध्यापक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्याला कॉम्प्युटरची माहिती असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

BMC Recruitment: मुंबई पालिकेत विविध पदांवर भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज
ऑफिस असिस्टंट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्याला कॉम्प्युटरची माहिती असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

अटेंडंट अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. त्याला संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ८ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Government Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट पदांची भरती, मुंबईत सरकारी नोकरीची संधी
वॉचमन कम गार्डनर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच त्यांच्याकडे संबंधित पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

२० सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेल वरील, जुना रोजगार चौक, सोलापूर ४१३००१ येथे पाठवायचे आहेत.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Startup Idea: फक्त १५ हजार रुपये गुंतवून ‘हा’ व्यवसाय सुरू करा, होईल लाखोंची कमाई

Business Idea: जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी अशीच एक ही …

NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिक्षक दिनानिमित्त शिक्षकांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात …