Startup Idea: फक्त १५ हजार रुपये गुंतवून ‘हा’ व्यवसाय सुरू करा, होईल लाखोंची कमाई

Business Idea: जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी अशीच एक ही माहिती महत्वाची ठरु शकते. आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यातून तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी वेगाने वाढत आहे. आपण या लेखातून नारळ पाण्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया. या व्यवसायासाठी तुम्हाला एक लहान दुकान लागेल आणि तुम्ही सहज पैसे कमवू शकाल.

नारळ पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, झिंक, सेलेनियम, आयोडीन आणि सल्फर मुबलक प्रमाणात असते. कोणत्याही आजारात डॉक्टर सहसा नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात.

तुम्ही हा व्यवसाय फक्त १५ हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता
या कामाला जास्त खर्च लागत नाही. त्यातील बहुतांश पैसा नारळ खरेदीत खर्च होतो. तुम्हाला दुकान उघडायचे असेल, तर तुमच्या स्थानिक बाजाराच्या दरानुसार भाडे आकारले जाईल. सरासरी अंदाजानुसार, तुम्ही १५ हजार रुपये गुंतवून नारळ पाण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. नारळ पाणी त्वरित ऊर्जा देते. एवढेच नाही तर शरीरातील पाण्याचे प्रमाणही पूर्ण करते. त्यामुळे अशा परिस्थितीत लोक प्रवास करताना आणि कोणत्याही आजारात असताना नारळ पाण्याचा अधिकाधिक वापर करतात.

उत्कृष्ट डिझाइनचा वापर करा
नारळ पाणी हाताने पिऊ शकत नाहीत असे अनेकांना वाटतेय त्यामुळे तुम्ही हे नारळ पाणी काढून पेपर कपमध्ये पॅक करू शकता. यासाठी तुम्ही उत्तम डिझाईन असलेला ग्लासही ठेवू शकता. यामुळे लोकांना पाणी पिणे सोपे जाईल आणि तुमचे दुकान जास्त काळ चालेल.

बसण्याची व्यवस्था करा
शक्य असल्यास, तुमच्या दुकानात लोकांना बसण्यासाठी जागा द्या. तुम्हाला हवे असल्यास, काही खुर्च्या किंवा कोणत्याही प्रकारची बसण्याची वस्तू ठेवा. पंखे किंवा कुलर अशी व्यवस्था केली तर बरे होईल. लोक तुमच्या दुकानात बराच वेळ थांबतील. गर्दी बघून येणाऱ्यांची संख्या आणखी वाढते असे म्हटले जाते.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशिक्षक दिनानिमित्त शिक्षकांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात …

शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना, ‘या’ मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Free Breakfast Scheme: तामिळनाडू सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना एक अद्भुत भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके …