प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला ह्यूमन ट्रॅफिकिंग म्हणजे मानवी तस्करी विरोधात शिक्षा सुनावण्यात आली होती. हे प्रकरण 19 वर्ष जुनं आहे. पटियालाच्या ट्रायल कोर्टानं त्याला दोषी ठरवून 16 मार्च 2018मध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. परंतू दलेरनी पटियाला कोर्टाच्या अँडिशनल सेशन जजकडे याचिका दाखल केली होती.
Punjab and Haryana High Court grants relief to singer Daler Mehndi; stays the decision of Patiala Court that had sentenced him to two years of imprisonment in a 2003 human trafficking case.
(Pic – Daler Mehndi’s Twitter profile) pic.twitter.com/mSQaTp9tBY
— ANI (@ANI) September 15, 2022
हेही वाचा – Ranveer Singh: न्यूड फोटोसोबत झालीय छेडछाड; पोलिसांसमोर रणवीर सिंहचा मोठा दावा
दलेर मेहंदीनं दाखल केलेल्या याचिकेवर चार वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर 14 जुलै 2022 रोजी दलेरची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर दलेर मेहंदीनं उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून आव्हान दिलं होतं. या याचिकेत गायकानं त्याच्या शिक्षेविरोधात केलेली याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थिगिती देण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. त्याच्या याचिकेला आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या