अभिनेता अनिकेत विश्वासराव एक्स पत्नी सह बिग बॉस मराठी 4 मध्ये? चर्चांना उधाण

मुंबई, 15 सप्टेंबर : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉस सुत्रसंचानल अभिनेते  महेश मांजरेकर करणार आहे. बिग बॉसचं नवं घरं देखील उघडण्यासाठी सज्ज झालं आहे.  पण बिग बॉसच्या घरात कोण कोण स्पर्धक जाणार याकडे सर्वांच लक्ष आहे. बिग बॉसमध्ये कॉन्ट्रोवर्शिअल व्यक्तींना विशेष करुन एंट्री दिली जाते हे गेली अनेक वर्ष प्रेक्षक पाहत आले आहेत. मागच्या तीन सीझनमध्ये देखील अनेक कॉन्ट्रोवर्शिअल व्यक्ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेले होते. चौथ्या पर्वात अशाच एका कॉन्ट्रोवर्शिअल अभिनेत्याचं नाव पुढे येत आहे.

मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव बिग बॉस मराठी 4 च्या घरात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. अनिकेत एकटाच नाही तर त्याची एक्स पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण देखील बिग बॉसच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यंतरी हे कपल चांगलंच चर्चेत आलं होतं. दोघांनी घटस्फोट घेतल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिनं अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत दोघांवर गंभीर आरोप केले होते. मात्र याबाबात अनिकेत विश्वासरावनं कोणताही खुलासा केला नव्हता. पण दोघांच्या चर्चा अनेक दिवस सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं.

हेही वाचा – Ganeshotsav 2022: ‘जुने दिवस परत आले’ म्हणत बिग बॉस फेम जय दुधाणे अन् दादूसनं घेतलं प्रभादेवीच्या राजाचं दर्शन

अनिकेत आणि स्नेहा यांचा घटस्फोट झाला आहे.  दोघांची भांडणं अनेकांना माहिती आहेत. त्यामुळे या दोन्ही कॉन्ट्रोवर्शिअल व्यक्ती बिग बॉसच्या घरात एकत्र येण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला नवरा आविष्कार दार्व्हेकर सहभागी झाले होते. त्याच्या नात्यातील ट्विस्टमुळे शो चांगलाच गाजला होता.

अभिनेता अनिकेत विश्वासराव मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तर स्नेहा देखील नवोदित अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. लाल इश्क या सिनेमात तिनं काम केलं आहे.   दोघांनी डिसेंबर 2018मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो देखील व्हायरल झाले होते.  दोघांची ओळख हृदयात वाजे समथिंग समथिंग या सिनेमावेळी झाली होती.  त्यावेळी स्नेहाच्या घरचे तिच्यासाठी मुलगा पाहत होते. अनिकेतच्या घरीही तिच गडबड होती. दरम्यान स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. दोघीही एकमेकीच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींच्या पुढाकारानं स्नेहा आणि अनिकेत यांचं लग्न झालं.  अनोळखी मुलीशी लग्न करण्यापेक्षा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला असं तेव्हा एका मुलाखतीत अनिकेत म्हणाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सैराटमध्ये आर्ची-परशाला संपवणाऱ्या प्रिन्सचे खऱ्या आयुष्यातही कुकृत्य

अहमदनगर, 15 सप्टेंबर : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं …

‘त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि…’; मिलिंद गवळींनी शेअर केला पडद्यामागचा किस्सा

मुंबई, 15 सप्टेंबर : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही सध्याची सर्वात लोकप्रिय मराठी …