अखेर प्रतिक्षा संपली! या तारखेला सुरु होणार Bigg Boss Marathi चा चौथा सीझन

मुंबई, 10 सप्टेंबर: लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोची लोक आतुरतेनं वाट पाहत असतात. ‘बिग बॉस मराठी’ हा शो घराघरात लोकप्रिय असून सध्या हा शो प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याची लोक कित्येक दिवसांपासून प्रतिक्षा करत आहेत. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली असून ‘बिग बॉस मराठी’चा पुढचा सीझन म्हणजेच ‘बिग बॉस मराठी 4’ प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार हे समोर आलं आहे.

बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन तुफान लोकप्रिय ठरला होता. हा सीजन संपल्यापासूनच प्रेक्षकांना चौथ्या सीजनची प्रतीक्षा लागून होती. काही दिवसांपूर्वी या शोचा प्रोमोसुद्धा रिलीज झाला होता. आता या शोची तारीखही समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ चा सीझन 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे.

100 दिवस एकाच घरात राहून हे स्पर्धक कधी एकमेकांची काळजी घेतात तर कधी एकमेकांचा जीव देखील घ्यायला निघतात. त्यामुळे संमीश्र भावना आपल्याा या शोमधून पहायला मिळत असतात. त्यामुळेच हा शो टीआरपी रेसमधील दमदार शो समजला जातो.

दरम्यान, प्रेक्षकांना आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीजनची ओढ लागली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी संभाळणार आहेत.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

टास्क, राडा अन् भांडणांची तारीख ठरली! वाचा कधीपासून सुरू होतंय बिग बॉस मराठी ४

मुंबई: बिग बॉस मराठीच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनची तारीख …

नाहीतर तुझी *** काढून…; आऊंनी मॅनेजरकडून असे वसूल केले होते कामाचे पैसे

मुंबई, 10 सप्टेंबर : मराठी सिनेसृष्टीतील असे काही तारे ज्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य …